शहरं
Join us  
Trending Stories
1
१ पद, २ विभाग अन् २ आदेश; CM देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्या खात्यांमध्ये नियुक्तीवरून संघर्ष?
2
“जनभावनेचा आदर करणारे हे सरकार, आम्ही...”; ‘महादेवी’ परतण्याबाबत एकनाथ शिंदेचे मोठे विधान
3
एकनाथ शिंदेंची दिल्लीवारी; अमित शाहांशी बैठकीत काय चर्चा झाली? खुद्द उपमुख्यमंत्री म्हणाले...
4
आधार ओटीपी वापरून ITRचं ई-व्हेरिफिकेशन करा, अन्यथा रिटर्न अवैध ठरेल; पाहा संपूर्ण प्रोसेस
5
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
6
'कायद्याच्या कचाट्यात महादेवी हत्तीला अडकवू नका, ... तोपर्यंत लढा सुरूच राहणार'; राजू शेट्टींनी स्पष्टच सांगितलं
7
बुकिंग करणाऱ्या ग्राहकांवरच शाओमी उलटली; आता म्हणतेय आठवड्यात पूर्ण पैसे द्या नाहीतर...
8
Wasim Jaffer: वसीम जाफरवर मोठी जबाबदारी, आता विदर्भातील खेळाडूंना शिकवतील फलंदाजीचे धडे!
9
ICC Test Ranking : मियाँ 'मॅजिक'नंतर 'मार मुसंडी' शो! सिराजला ICC कडून मिळालं मोठं गिफ्ट
10
ITR आणि टॅक्स डेडलाईनमध्ये काय फरक आहे? शेवटची तारीख कधी? ५,००० दंडापासून वाचण्यासाठी लगेच वाचा!
11
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
12
"आधी माझ्या बायकोला वाचवा...."; पुरात अडकलेल्या नवऱ्याची धडपड, जिंकली लोकांची मनं
13
एकटं बसलं होतं जोडपं, पाठीमागून २ युवक आले; गर्लफ्रेंडला सोडून बॉयफ्रेंड पळाला, त्यानंतर जे घडलं...
14
तो 'सोंगाड्या'! DSP सिराजसंदर्भात नेमकं काय म्हणाला जो रुट?
15
'स्वराज्यरक्षक संभाजी' फेम प्राजक्ता गायकवाडचा उद्या साखरपुडा, मेहंदीचा व्हिडीओ आला समोर
16
दिल्लीसह देशभरातील वीज ग्राहकांना बसणार ‘शॉक’, वीजदरात वाढ करण्यास सुप्रीम कोर्टाची मंजुरी
17
इराणमध्ये मोठे राजकीय फेरबदल; 'सुप्रीम लीडर'ने कट्टरपंथी विरोधी नेत्याला दिली मोठी जबाबदारी
18
एकनाथ शिंदे यांनी केले अमित शाह यांचे तोंडभरून कौतुक; बाळासाहेब ठाकरेंचे नाव घेत म्हणाले...
19
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
20
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध ऐतिहासिक विजय मिळाल्यानंतरही टीम इंडियाने सेलिब्रेशन का नाही केलं? कारण...

१६ हजार फुटांवर..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 20, 2018 11:29 IST

ऊन, पाऊस, हिमवर्षाव, हेलपाटून टाकणारा वारा, बोचरी थंडी... अशा वातावरणात हिमालयातला आमचा प्रवास सुरू आहे.. १६ हजार फुटांवरील ‘झिरो पॉइंट’नंतर आम्हाला वेध लागले होते ‘कांचनजंगा’चे. पहाटे ४ वाजल्यापासून गोठवणाऱ्या थंडीत पाय आपटत येरझाºया घालत होतो. ढगांच्या तलम पदराआडून ‘तिनं’ पुसट दर्शन दिलं आणि आम्ही धन्य झालो !

- वसंत वसंत लिमये

मागे वळवलेले विरळ पांढरे केस, गोरापान रंग, वृद्धत्वामुळे उघड्या मनगटावर दिसणारे तांबूस चट्टे. चिक्कार सुरकुत्या, पांढऱ्या भुवया आणि पांढºया पापण्यांआडून डोकावणारी भेदक निळसर; परंतु प्रेमळ नजर रोखत प्रश्न विचारला गेला,‘तुला कांचनजंगा का चढायचं आहे?’ दिवस होता ८ एप्रिल, १९८७. स्थळ - बॉम्बे हाउस, मुंबई. आमची मीटिंग सुरू होऊन विसेक मिनिटं झाली असतील. मला घाम फुटला होता. आजोबांचं नाव होतं - जे.आर.डी. टाटा! आमच्या ‘गिरीविहार कांचनजंगा’ मोहिमेच्या तयाºया सुरू झाल्या होत्या. मी आणि दिलीप लागू, ‘जेआरडी’ यांच्याकडे मोहिमेला शुभेच्छा मिळवण्यासाठी गेलो होतो. आधीच्या संभाषणात त्यांची काळजी जाणवत होती; परंतु आम्ही ज्या आशेनं आलो होतो, त्याची मला आता शाश्वती नव्हती. बहुदा काहीच मिळणार नाही, असा रंग दिसत होता. मला काय झालं कुणास ठाऊक; पण माझ्या डोळ्यांसमोर १९८० साली झोन्ग्रीहून पाहिलेलं कांचनजंगा तरळू लागलं. पहाटे ५ वाजता, काकडून टाकणाºया बोचºया थंडीतही त्या दिमाखदार शिखराची मोहिनी मला लख्ख आठवत होती. पुढील पंधरा मिनिटं मी काय बोललो त्याचं मला भान नव्हतं. आजोबा शांतपणे लक्षपूर्वक ऐकत होते. किंचित डोळे मिटून, मान हलवत ते म्हणाले,‘मला कळतंय तुम्हाला ‘कांचनजंगा’ का चढायचं आहे!’ त्यानंतर आजोबांनी सांगितलेली कहाणी अद्भुत होती. चाळीस/पन्नास वर्षांपूर्वी ‘जेआरडी’ मधुचंद्रासाठी तंबू, पोर्टर्स, खेचरं अशा लवाजम्यासह दार्जिलिंगला गेले होते. तशाच एका पहाटे उगवत्या किरणांची सोनेरी झळाळी असलेलं ‘कांचनजंगा’ त्यांनाही आठवत होतं. एक समान तार छेडली गेली होती. आज ११ मे, २०१८, पहाटे आम्ही उत्तर सिक्कीममधील पेलिंग येथे ‘कांचनजंगे’च्या दर्शनाची वाट पाहत बसलो असता, काकडवणाºया थंडीत मला ते प्रेमळ निळसर डोळे आठवत होते..‘हिमयात्रा २०१८’ मोहिमेची सुरुवात झाली २ मे रोजी. ड्रायव्हर अमित शेलार, सोबत मयूर असे दोघे ‘गिरिजा’ म्हणजेच करवेव ऊ-टं७ ही गाडी घेऊन नाशिक, इंदूर, कानपूर, कुशीनगर असं करत, शक्यतोवर बिहारमध्ये मुक्काम करावा लागणार नाही अशी काळजी घेऊन५ तारखेला संध्याकाळी, सुमारे २,४०० किमीचा प्रवास करून बागडोगरा येथे पोहचले. मृणाल परांजपे, संजय रिसबूड, प्रेम मगदूम आणि मी असे ६ मेला बागडोगरा इथून तडक गंगटोकला रात्री८ वाजता पोहचलो. बंगालचा बकालपणा मागे सोडून, रांगपो येथे आम्ही सिक्कीममध्ये प्रवेश केला. पावसाची झिमझिम सुरू झाली होती. हवामानासंदर्भात शंकेची पाल चुकचुकली.सिक्कीममध्ये सर्वप्रथम जाणवते ती स्वच्छता, प्लॅस्टिकचा अभाव. सुचीपर्ण वृक्षांचे हिरवेगार डोंगर उतार, उदंड खळाळत वाहणारे निर्झर आणि प्रपात, हिमाच्छादित शिखरं यांनी नटलेला श्रीमंत तजेलदार निसर्ग. छोटी छोटी टुमदार घरं, सुंदर रंगसंगती आणि साधी सोपी माणसं. याशिवाय नजरेत भरणारी गोष्ट म्हणजे इथल्या देखण्या स्त्रिया! सगळीकडे मंगोलियन चेहरेपट्टी असली तरी, नेटकी नाकं आणि गोरेपान हसरे चेहरे तुमचं स्वागत करतात. महत्त्वाची बाब म्हणजे सगळीकडे कामं करणाºया स्त्रियाच दिसतात. इथले बाप्ये काय करतात कुणास ठाऊक? सिक्कीममध्ये आल्यावर आपण स्विर्त्झलण्डमध्ये असल्याचा भास होतो.७ तारखेच्या सोमवारी आम्ही विरळ हवेच्या सरावासाठी नथुला पासच्या वाटेवरील त्सोन्ग्मो सरोवर पहायला गेलो. समुद्रसपाटीवरून थेट दहा हजार फुटाच्या उंचीवर जाणं धोक्याचं असतं. दुसºयाच दिवशी आम्ही लाचेन आणि लाचुंग अशा तीन दिवसांच्या सफरीवर निघणार होतो. इथे खासगी वाहनांना परमिट आणि प्रवेश मिळणं मुस्कील म्हणून आम्ही भाड्याची गाडी ठरवली. सकाळीच ड्रायव्हर आम्हाला बोलवायला, आमच्या हॉटेलवर, गाडी थोडी लांब पार्क करून आला. गाडीपाशी पोहचलो तर तिथे मोटारसायकलवरील निळ्या-काळ्या वेशातील पोलीस दत्त म्हणून हजर ! अतिशय नीटनेटका, अजिबात पोट नसलेला कर्तव्यदक्ष पोलीस पाहून आम्ही थक्क झालो. (आपल्याला) सवयीच्या अजागळ, ढेरपोट्या लोभीपणाचा कुठे मागमूसही नव्हता. झटकन दंडाची पावती फाडून, कुठलीही घासाघीस, देवाण-घेवाण न होता आम्ही मार्गस्थ झालो. इथली कायदा आणि सुव्यवस्था वाखाणण्याजोगी आहे.ऊन, पाऊस, हिमवर्षाव यांचा लपंडाव सुरूच होता. यावर्षी कदाचित पावसाळा लवकर आहे. कांचनजंगेच्या छायेत असलेल्या लाचेन या झोपाळू गावी पोहचलो, तोपर्यंत आभाळ भरून आलं होतं. रात्री तुफान हिमवर्षाव झाला असावा; पण सकाळ मात्र लख्ख सूर्यप्रकाश घेऊन उगवली. आम्ही उत्साहात गुरु डोंगमार सरोवराकडे निघालो. सभोवताली चमचमणारी हिमशिखरं आणि स्वच्छ निळं आकाश मनमोहक होतं.अतिहिमवृष्टीमुळे आम्हाला १३ किमी अलीकडूनच परत फिरावं लागलं. काहीसे खट्टू होऊनच आम्ही लाचुंगला पोहचलो. लाचुंग हे युमथांग खोºयात आहे. रेंगाळलेलं हिम आणि स्वच्छ सूर्यप्रकाश घेऊनच, ९ तारखेची सकाळ बोचºया थंडीसह उजाडली.आमचा उत्साह कायम होता आणि निसर्गानेही साथ दिली. १६,१०० फुटांवरील ‘झिरो पॉइंट’ या तिस्तेच्या उगमापाशी आम्ही जाऊन आलो. पांढरे स्वच्छ हिमाच्छादित उतार, खळाळती अल्लड तिस्ता नदी, अनेकविध रंगांच्या ºहोडेडेन्ड्रॉनचे जंगल आणि वाटेत जोडीला लाभलेला भारतीय सैन्याचा पाहुणचार अवर्णनीय होता. ते गोठविणारं अतिउंचीवरील विरळ हवामान, खडतर जगणं, मर्यादित सोयी आणि तरीही सतर्कपणे, विनातक्र ार चीनच्या सीमेवर अखंड कार्यरत असणाºया सैन्याला पाहून ऊर भरून आला. भारतीय सैन्य, आपले जवान तुम्हाला त्रिवार वंदन!आम्हाला आता वेध लागले होते पेलिंग येथून घडणाºया ‘कांचनजंगा’ दर्शनाचे. अनिश्चिततेचं वातावरण. माझे सोबती मात्र भारी होते. हसत खेळत, एक अफलातून विनोदाची झालर घेऊन संजय, प्रेम आणि मृणाल यांनी साºयाच प्रवासात बहार आणली. प्रेम हा मस्त छायाचित्रकार आणि त्यांनी इतरांचीही छान शिकवणी घेतली.पेलिंगच्या वाटेवरील योकसम हे सिक्कीमच्या नामग्याल वंशातील पहिल्या राजाच्या, १६४२ साली आलेल्या राज्याभिषेकाचं ठिकाण.तीन लामा उत्तर, पश्चिम आणि दक्षिण दिशांनी आले, तर भावी राजा पूर्वेकडून. ‘योक’ म्हणजे लामा अथवा साधू, तर ‘सम’ याने की तीन. योकसमहून आम्ही पेलिंगला मुक्कामी पोचलो. ‘काब्रू’ नॉर्थ आणि साउथ, ‘राथोंग, ‘कोकतांग’ आणि ‘जानू’ म्हणजेच कुंभकर्ण अशी ‘कांचनजंगा’ समूहातील इतर शिखरं लखलखीत दर्शन दिमाखात देऊन गेली; परंतु ‘तिने’ मात्र हुलकावणी दिली.पेलिंगहून आम्ही टुम्लिंग या ‘कांचनजंगे’पासून दक्षिणेकडे येणाºया सिंगालिला धारेवरील, १०,००० फूट उंचीवरील ठिकाणी निघालो होतो. वाटेतच ‘मनेभंजांग’ येथे निर्मल खरे आणि अजित देसवंडीकर हे पुढील आठवड्यातील भिडू भेटले. पुन्हा ‘तिच्या’ दर्शनाच्या आशेनं उत्साहाचं वारं सळसळू लागलं.पहाटे ४ वाजल्यापासून गोठवणाºया थंडीत पाय आपटत येरझाºया घालत असताना, ढगांच्या तलम पदराआडून ‘तिनं’ पुसट दर्शन दिलं. आम्ही धन्य झालो होतो!गेले दोन महिने, तिन्ही त्रिकाळ डोक्यात केवळ ‘हिमयात्रा नियोजन’ हा एकच विषय होता. सोबत येणारे इतर ‘यात्री’ हळूहळू या प्रक्रि येत सामील होत गेले. साºयांनाच ‘यात्रे’चा ताप चढू लागला. त्यांच्या प्रामाणिक शंका, मौलिक सूचना आणि माझा हिमालयातील गिर्यारोहणाचा अनुभव यामुळे नियोजन सुकर होत गेलं.एकट्यानंच काही करणं यात स्वातंत्र्य जरूर असतं; पण त्यात एककल्लीपण येऊ शकतो. मला इतरांना बरोबर घ्यायला आवडतं, त्यात मजा येते. अर्थात याबरोबर काही आव्हानं येतात. पण सगळ्यांबरोबर आनंद द्विगुणीत करण्याची संधीही असते.‘काही विसरेल’ हे भूत मला अखंड सतावत होतं आणि नाही म्हटलं तरी माझ्यावरील जबाबदारीचं भान मला होतं. मृणाल, संजय आणि प्रेम दिल्ली विमानतळावर भेटले आणि खºया अर्थानं ‘यात्रे’ला सुरुवात झाली. डोक्यातली जळमटं दूर होऊ लागली, हलकं वाटू लागलं. हिमालय, सिक्कीमचा उलगडणारा निसर्ग यामुळे वृद्ध आईची तब्ब्येत, इतर जबाबदाºया यांच्या काळजीचं ओझं सुसह्य होऊ लागलं. गेल्या आठवड्यात ‘मी कोण’, माझ्या जबाबदाºया, मला वाटणारी काळजी या गोष्टी मागे पडत गेल्या.खरंच आपल्या मेंदूच्या ‘हार्ड डिस्क’ची क्षमता अफाट आहे. पण म्हणूनच अनेकदा आपण त्यात चिंता, काळजी, स्वप्नं असं काय वाट्टेल ते साठवतो आणि त्यात गुंतून पडतो. या सर्व गोष्टींचं भान असावं पण त्याचं निरर्थक ओझं बाळगण्याचं काहीच प्रयोजन नाही. यातून मोकळं होण्यासाठी इतरांवर न कचरता विश्वास टाकावा लागतो. यश-अपयश, सुख-दु:ख, अपेक्षा-निराशा हे नेहमीच आपल्यासोबत असतं. मागे काय सोडलं आणि पुढे काय होणार, यातून मुक्त होऊन आत्ताचा क्षण जगता आला पाहिजे. वर्तमान म्हणजेच प्रेझेण्ट ही एक देणगी आहे, तिचा स्वच्छंद आनंद घेता आला पाहिजे. यालाच स्थितप्रज्ञता म्हणत असावेत! हिमालय तुम्हाला एका वेगळ्याच उंचीवर घेऊन जातो. टुम्लिंगहून खतरनाक उताराच्या रस्त्यानं उतरताना मला त्या स्थितप्रज्ञ ‘आजोबां’चे ते निळसर डोळे आठवत होते.(लेखक ज्येष्ठ गिर्यारोहक आहेत.)