मुळा धरणात जिलेटीनचे स्फोट

By Admin | Updated: June 3, 2015 01:48 IST2015-06-03T01:48:53+5:302015-06-03T01:48:53+5:30

मुळा धरणात मासेमारीसाठी चक्क जिलेटीनच्या कांड्यांचा स्फोट घडवून आणला जात असल्याचा धक्कादायक प्रकार बॉम्ब शोधक

Zlatin explosion in Mula dam | मुळा धरणात जिलेटीनचे स्फोट

मुळा धरणात जिलेटीनचे स्फोट

राहुरी (अहमदनगर) : मुळा धरणात मासेमारीसाठी चक्क जिलेटीनच्या कांड्यांचा स्फोट घडवून आणला जात असल्याचा धक्कादायक प्रकार बॉम्ब शोधक पथकाच्या पाहणीत आढळून आला. याव्यतिरिक्त भिंतीलगत मच्छिमारांचा विनापरवाना रहिवास, धरणापर्यंत जाण्याचे पाच अनधिकृत मार्ग, मद्यपार्ट्या अशा अनेक गंभीर त्रुटी उघड झाल्या आहेत.
मुळा धरणाची सुरक्षा किती लवचिक आहे, याबाबत ‘लोकमत’ने स्टिंग आॅपरेशनद्वारे प्रकाश टाकला होता. त्याची दखल घेत मंगळवारी दुपारी गृह विभागाच्या बॉम्बशोधक पथकाने धरण परिसराची कसून पाहणी केली. त्यात अनेक धक्कादायक प्रकार समोर आले आहेत.
पथक पोलीस चौकीजवळ आले असता, तेथील सुरक्षारक्षक व पोलीस गाढ झोपेत असल्याचे आढळून आले़ मुळा धरणावरील व्हीआयपी गेस्ट हाऊसमध्येही पाच कर्मचारी निवांत पहुडले होते. त्यानंतर पाटबंधारेचे सहशाखा अभियंता सतीश जाधव व अन्य काही कर्मचाऱ्यांना घेऊन पथकाने धरणाच्या मोऱ्यावरून दुर्बिणीद्वारे पाहणी केली असता, मुख्य भिंतीच्या पश्चिम बाजूला मच्छिमारांच्या तीस अनधिकृत झोपड्या आढळल्या. या मच्छिमारांचे नाव, पत्ता, तसेच कुठलीही नोंद पाटबंधारे विभागाकडे नाही. पोलीस चौकी धरणाच्या मुख्य भिंतीपासून थेट तीन किलोमीटरवर का, या प्रश्नावरही कर्मचारी अनुत्तरित होते. पोलीस चौकी मुख्य भिंतीजवळच हवी, असा अभिप्राय पथकाने नोंदवला.
कहर म्हणजे धरणावर पोहोचायला मुख्य मार्ग सोडून इतर पाच अनधिकृत मार्ग असल्याचे समोर आले. या पाच प्रवेशद्वारातून कोणीही अवघ्या काही मिनिटांत धरणावर येऊन घातपात करू शकतो, ही नोंदही पथकाने घेतली. (तालुका प्रतिनिधी)

Web Title: Zlatin explosion in Mula dam

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.