जि.प. शाळांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव
By Admin | Updated: May 25, 2014 00:29 IST2014-05-25T00:29:12+5:302014-05-25T00:29:12+5:30
तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिकता यावे, या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत कोणीही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये,

जि.प. शाळांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव
विक्रमगड : तालुक्यातील प्रत्येक विद्यार्थ्याला शिकता यावे, या शिक्षण हक्क कायद्यांतर्गत कोणीही विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहता कामा नये, यासाठी जिल्हा परिषद विभागाने तालुक्यातील ८ वी इयत्तेसाठी १३ शाळांचे प्रस्ताव पाठविले आहेत, तर ५ वीसाठी १५ शाळांच्या मंजुरीसाठी प्रस्ताव पाठविण्यात आल्याची माहिती शिक्षणाधिकारी आर. मोकाशी यांनी दिली. या प्रस्तावीत शाळा १६ जूनपासून नियमीत सुरू होणार आहे व प्रत्येक विद्यार्थ्यांना प्रवेश दिला जाणार आहे. तालुक्यात ६ आश्रमशाळा, १० अनुदानित शाळा असून आता जिल्हापरिषदेच्याही शाळा सुरू होणार आहेत. तालुक्यात आठवीसाठी गावीतपाडा, म्हसरोली, इंदगाव, विक्रमगड, डोल्हारी (बु.), सारशी, चिंचघर, देहर्जे, टेटवाली, बालापूर, गेल्हारी (खु.) इ. तर पाचवीसाठी गोंडपाडा, सजन, शीळ, आंबिवली, मुरबीपाडा, माण, कशिवली, करसुड, लहागेवाडा, खानेपाडा, कवडास, झोपवाडा या ठिकाणी शाळा सुरू करण्यात येणार आहेत, परंतु तीन किलोमीटर अंतरावरील शाळा असेल, तर त्या परिसरात शाळांना मान्यता मिळणार नसून ही अट ग्रामीण भागासाठी शिथील करून सर्वच प्रस्तावाना मंजुरी द्यावी, अशी मागणी शिक्षण समितीने केली आहे. संपूर्ण शाळाना मंजुरी मिळाल्यास आदिवासी विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहणार नाही. (वार्ताहर)