अश्लील पोस्ट टाकल्याप्रकरणी जि.प. सदस्याविरुद्ध गुन्हा
By Admin | Updated: July 7, 2016 21:00 IST2016-07-07T21:00:20+5:302016-07-07T21:00:20+5:30
जिल्हा परिषदेच्या महिला उपाध्यक्षांना उद्देशून व्हॉट्स अॅपवर अश्लील मजकूर टाकल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते गंगाझर परशुरामकर यांच्यावर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला

अश्लील पोस्ट टाकल्याप्रकरणी जि.प. सदस्याविरुद्ध गुन्हा
गोंदिया : जिल्हा परिषदेच्या महिला उपाध्यक्षांना उद्देशून व्हॉट्स अॅपवर अश्लील मजकूर टाकल्याप्रकरणी जिल्हा परिषदेचे विरोधी पक्षनेते गंगाझर परशुरामकर यांच्यावर स्थानिक पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला. गुरूवारी (दि.७) त्यांना न्यायालयाने जामीन मंजूर केला.
जिल्हा परिषद उपाध्यक्ष रचना गहाणे यांनी परशुरामकर यांच्या विरोधात व्हॉट्स अॅपवर अश्लील संदेश पोस्ट केल्याचा आरोप करीत तक्रार नोंदविली. यावर पोलिसांनी परशुरामकर व किशोर तरोणे यांच्याविरूद्ध भादंविच्या कलम ३५४ अ (१) व (३), ५०९, १०७ तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्याच्या कलम ६७ अन्वये गुन्हा दाखल केला. या प्रकरणी बयाण नोंदविण्यात आले व परशुरामकर आणि तरोणे यांना गुरूवारपर्यंत (दि.७) न्यायालयात हजर राहण्याची नोटीस देण्यात आली. त्यानुसार ते गुरूवारी न्यायालयात हजर झाले असता न्यायलयाने त्यांना जामीन मंजूर केला