जिल्हा परिषद चिक्कीच घेणार

By Admin | Updated: February 16, 2016 01:34 IST2016-02-16T01:34:54+5:302016-02-16T01:34:54+5:30

गेल्या वर्षी गाजलेल्या चिक्की घोटाळ्यानंतर पुणे जिल्हा परिषदेने मात्र चिक्कीच घेणार, असा दावा केला होता. सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी गुणवत्तेच्या हमीवर खरेदीला मंजुरी दिली असून

Zilla Parishad will take Chikki | जिल्हा परिषद चिक्कीच घेणार

जिल्हा परिषद चिक्कीच घेणार

पुणे : गेल्या वर्षी गाजलेल्या चिक्की घोटाळ्यानंतर पुणे जिल्हा परिषदेने मात्र चिक्कीच घेणार, असा दावा केला होता. सोमवारी झालेल्या सर्वसाधारण सभेत सदस्यांनी गुणवत्तेच्या हमीवर खरेदीला मंजुरी दिली असून १ कोटी ९० लाख रुपयांच्या चिक्की खरेदी करणार आहे.
चिक्की खरेदीवरून सर्वसाधारण सभेत सदस्यांनी अनेक प्रश्न उपस्थित केले. मात्र चिक्कीची गुणवत्ता कोठेही तपासा असे अध्यक्षांनी सांगितल्यानंतर नगर जिल्ह्यातील निर्विकार उद्योगसमूह आणि पुण्यातील ठाकूर फुड प्रॉडक्टस्ची निविदा मंजूर करण्यात आली आहे. मात्र यामुळे लोणावळा चिक्कीच खरेदीचा दावा संपला आहे.
लोणावळा येथील मगनलालने प्रतिकिलो २२२ रुपये दर निविदेत भरला होता, तर निर्विकार आणि ठाकूर यांचा दर १६८ रुपये किलो असल्याने या दोघांकडून समान रकमेची चिक्की खरेदी होणार आहे. या खरेदीच्या ई-निविदा आज मान्यतेसाठी सर्वसाधारण सभेपुढे ठेवण्यात आली होती.
मात्रण नगरच्या चिक्कीवरून गेल्या वर्षी राज्यात मोठी चर्चा झाली होती. त्यामुळे गुणवत्ते व दर्जाबाबात शिवसेना सदस्य कुलदीप कोंडे, माऊली खंडागळे, आबा सायकर यांनी प्रश्नांची सरबत्ती केली. तेव्हा अध्यक्ष प्रदीप कंद यांनी पूर्णपणे शास्त्रीय तपासणी आणि गुणवत्तेची चाचणी करून ही चिक्की खरेदी होत आहे. दर्जामध्ये कोणतीही तडजोड होणार नाही. तुम्ही चिक्की कोठेही तपासा असे आव्हान दिल्यानंतर अखेर मंजुरी मिळाली. (प्रतिनिधी)२५ हजार विद्यार्थ्यांना सायकली
जिल्ह्यातील २५ हजार विद्यार्थ्यांसाठी सुमारे साडेनऊ कोटी रुपयांच्या सायकलखरेदीची ई निविदेला सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली. मुलांसाठी रवि इंडस्ट्रीज, लुधियाना यांची ३५०० रुपये आणि मुलींसाठी कोहिनूर सायकल, लुधियाना यांची ३३५८ रुपये किंमतीची सायकल खरेदी करण्यात आली आहे. येत्या मार्चपूर्वी विद्यार्थ्यांना या सायकली मिळणार आहेत.

Web Title: Zilla Parishad will take Chikki