जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत जाहीर

By Admin | Updated: June 10, 2016 16:32 IST2016-06-10T16:32:41+5:302016-06-10T16:32:41+5:30

राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे. राज्यातील 26 जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका ह्या पुढील वर्षाच्या सुरुवातीला होत आहेत.

Zilla Parishad announced the reservation for president | जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत जाहीर

जिल्हा परिषद अध्यक्षपदासाठी आरक्षण सोडत जाहीर

ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १० - राज्यातील जिल्हा परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अध्यक्षपदाच्या आरक्षणाची सोडत जाहीर झाली आहे.
राज्यातील 26 जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या निवडणुका ह्या पुढील वर्षाच्या सुरुवातीला होत आहेत.

कोणत्या जिल्ह्याला कोणतं आरक्षण?

अनुसूचित जाती - भंडारा, अमरावती

अनुसूचित जाती महिला राखीव - हिंगोली, नागपुर

अनुसुचित जमाती महिला - नंदुरबार ,ठाणे, गोंदिया,

अनुसूचित जमाती - वर्धा, पालघर

नागरिकांचा मागास प्रवर्ग ( ओबीसी ) -अकोला, उस्मानाबाद, धुळे, पुणे

नागरिकांचा मागास प्रवर्ग महिला ( ओबीसी ) - जळगांव, बुलढाणा, औरंगाबाद, परभणी, यवतमाळ,

सर्वसाधारण प्रवर्ग महिला - सातारा, रत्नागिरी, नाशिक, रायगड, अहमदनगर, सोलापूर, लातूर, वाशीम,

सर्वसाधारण प्रवर्ग - जालना, नांदेड, चंद्रपुर, गडचिरोली, कोल्हापुर, सिंधुदुर्ग, बीड, सांगली

यापैकी धुळे, नंदुरबार, अकोला , वाशीम यांची आरक्षणे या जूनपासून लागू होतील. पालघरचे जुलै 2017 पासून
तर भंडारा, गोंदिया चे डिसेंबर 2017 पासून लागू होणार आहे. इतर जिल्ह्यांचे 2017 मार्च मध्ये निवडणूक झाल्यानंतर होणार आहे.

 

Web Title: Zilla Parishad announced the reservation for president