शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

Maharashtra Political Crisis: “अन्यथा तुम्हाला शिवसेना स्टाइलनेच उत्तर देऊ”; शहाजीबापू पाटलांना शरद कोळींचा थेट इशारा

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 3, 2022 21:12 IST

Maharashtra Political Crisis: शहाजीबापू पाटील मातोश्रीसमोर जाऊन नाक घासत होते, याचा त्यांना आता विसर पडला आहे, या शब्दांत शरद कोळी यांनी सडकून टीका केली आहे.

Maharashtra Political Crisis: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटाला (Eknath Shinde) राज्यभरातून वाढता पाठिंबा शिवसेनेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) पक्ष आणि संघटना वाचवण्यासाठी आटोकाट प्रयत्न करत असल्याचे पाहायला मिळत आहेत. आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) हेदेखील राज्यभर दौरे करत आहेत. यातच पडत्या काळात पक्षाची बाजू लावून धरणाऱ्या युवासेनेच्या एका नेत्याने शिंदे गटातील आमदार शहाजीबापू पाटील (Shahaji Bapu Patil) यांच्यावर टीका करत, तुम्हाला शिवसेना स्टाइलनेच उत्तर देऊ, असा इशारा दिला आहे. 

युवासेना नेते शरद कोळी यांची युवासेनेच्या राज्य विस्तारकपदी निवड झाल्यापासून, ते सातत्याने शिंदे गटातील मंत्री, आमदारांवर जोरदार हल्लाबोल करताना दिसत आहेत. यातच शरद कोळी यांनी शहाजीबापू पाटील यांच्यावर बोचरी टीका केली. मात्र, ही टीका करताना शरद कोळी यांची जीभ घसरल्याचे सांगितले जात आहे. ते संत्रा पिऊन बोलताना की हातभट्टीवरील तांब्या मारून बोलतात, नेमके तेच कळत नाही, असे शरद कोळी यांनी म्हटले आहे. 

शहाजी बापू पाटील मातोश्रीसमोर जाऊन नाक घासत होते

शहाजीबापू हे त्यांच्याकडे बायकोला लुगडं घ्यायला पैसे नाहीत, असे सांगतात. एवढेच नव्हे तर हातभट्टीची दारु प्यायल्यानंतर शहाजी पाटील  त्याचं बिलही दुसऱ्याला भरायला लावतात. ते शहाजीबापू उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना काय घर बांधून देणार, असा टोला लगावत, आमदार होण्यासाठी शहाजीबापू पाटील मातोश्रीसमोर जाऊन नाक घासत होते, याचा आता त्यांना विसर पडला आहे. शहाजी पाटील यांनी वायफळ बडबड बंद करा, अन्यथा तुमच्या घरावर शिवसेना स्टाईलने उत्तर देऊ, असा इशारा देत शरद कोळी यांनी शहाजीबापू पाटील यांच्यावर सडकून टीका केली. 

दरम्यान, पडायची प्रॅक्टिस महाराष्ट्रात माझ्याएवढी कुणाची आहे? सात आठवेळा धडाधडा पडलो होतो, असे शहाजीबापू पाटील यांनी म्हटले होते. तसेच उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरेंनी सांगोल्यात येऊन लोकांची कामे करावी. त्यासाठी दोघांना बंगले भाड्याने घेऊन देतो, अशी टिप्पणी शहाजीबापू पाटील यांनी केली होती. 

टॅग्स :Maharashtra Political Crisisमहाराष्ट्राचे राजकीय अस्थिरतेचा गोंधळSolapurसोलापूरEknath Shindeएकनाथ शिंदे