शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
4
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
5
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
6
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
7
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
8
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
9
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
10
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
11
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
12
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
13
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
14
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
15
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
16
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
17
Numerology: नशिबाची साथ हवीय? मग महत्त्वाच्या कामाला जाताना आपल्या जन्मतारखेनुसार वापरा 'हा' खास रंग!
18
पाकिस्तानचा पोपट झाला, युद्धविरामाच्या अटींबाबत शाहबाज शरीफ यांचा दावा जेडी वेन्स यांनी फेटाळला
19
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
20
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
Daily Top 2Weekly Top 5

युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरेंचा शिवसेना आमदारांसोबत मुक्काम

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2019 08:35 IST

राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कुठलीही फाटाफूट होऊ नये म्हणून शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना मालाड येथील रिट्रीट हॉटेलमध्ये ठेवले आहे.

मुंबई  - राज्यातील राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर कुठलीही फाटाफूट होऊ नये म्हणून शिवसेनेने आपल्या सर्व आमदारांना मालाड येथील रिट्रीट हॉटेलमध्ये ठेवले आहे. दरम्यान, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी शनिवारी रात्री रिट्रीट हॉटेलला अचानक भेट देत आमदांरांसोबत चर्चा केली. त्यानंतर आदित्य ठाकरे यांनी आमदारांसोबतच हॉटेलमध्ये मुक्काम केला. विधानसभा निवडणुकीत भाजपा आणि शिवसेना महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले होते. मात्र निकलांनंतर शिवसेनेने मुख्यमंत्रिपदाबाबत आग्रही भूमिका घेतली. पण भाजपाने शिवसेनेला मुख्यमंत्रिपदासह महत्त्वाची खाती देण्यास नकार दिला. त्यानंतर शिवसेनेने अधिकच ताठर भूमिका घेतली होती. त्यामुळे 13 व्या विधानसभेची मुदत संपल्यानंतरही नवे सरकार स्थापन होऊ शकलेले नाही. सत्तेत सहभागासाठी काँग्रेस राजी होईना, राष्ट्रवादी मात्र आग्रही एकीकडे राज्यपालांनी सर्वात मोठा पक्ष म्हणून भाजपला सत्ता स्थापन करण्यासाठी आमंत्रित केले असताना दुसरीकडे शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस मिळून सरकार स्थापन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. काँग्रेसने कोणत्याही परिस्थितीत सत्तेत सहभागी व्हायला हवे अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली आहे. मात्र काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी त्यासाठी राजी नाहीत. अशावेळी फार तर शिवसेना- राष्ट्रवादीच्या सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याची भूमिका काँग्रेस घेऊ शकते.मुंबई, दिल्लीतील काही ज्येष्ठ काँग्रेस नेत्यांशी चर्चा केली असता त्यांनी ही परिस्थिती स्पष्ट केली. काँग्रेसचे बहुसंख्य आमदार हे आपल्या पक्षाने शिवसेना-राष्ट्रवादीसोबत सरकारमध्ये सहभागी व्हावे या मताचे आहेत. मात्र काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांचा त्यास विरोध आहे. हिंदुत्वासह विविध मुद्यांवर शिवसेनेची असलेली भूमिका काँग्रेसच्या भूमिकेशी विसंगत अशीच राहिली आहे. शिवसेनेसोबत सरकारमध्ये बसले तरी किंवा बाहेरून पाठिंबा दिला तरी काँग्रेसला ते राजकीयदृष्ट्या परवडणार नाही, असा सूर दिल्लीत आहे.शिवसेना-राष्ट्रवादीसोबत आपणही सरकारमध्ये सहभाग सहभागी व्हावे ही भूमिका मांडण्यासाठी काँग्रेसच्या काही आमदारांनी सोनिया गांधी यांची भेट मागितली होती; मात्र ती मिळाली नाही. राष्ट्रवादीकडून फारच आग्रह धरला गेला तर काँग्रेस एखादवेळी सेना-राष्ट्रवादी सरकारला बाहेरून पाठिंबा देण्याचा विचार करू शकेल,पण तूर्त तोही विचार फक्त समोर नाही. काँग्रेस सत्तेत सहभागी झाली नाही तर सरकारला स्थैर्य असणार नाही; किंबहुना सरकार सहा आठ महिन्यांच्या वर टिकणार नाही असे राष्ट्रवादीच्या शीर्षस्थ नेत्यांना वाटते. याआधी काही राज्यांमध्ये तसा अनुभव देखील आलेला आहे.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाMLAआमदारMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019