शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

मुख्यमंत्र्यांआधी आदित्य ठाकरेंची यात्रा; 'जन आशीर्वाद' घेत महाराष्ट्र पिंजून काढणार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2019 12:44 IST

विधानसभा निवडणुकीआधी आदित्य ठाकरेंची महत्त्वपूर्ण यात्रा

ठळक मुद्देयेत्या शुक्रवारपासून यात्रेला सुरुवातविधानसभेच्या पार्श्वभूमीवर यात्रेला महत्त्वयात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार

मुंबई: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पाठोपाठ युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यात्रेच्या माध्यमातून महाराष्ट्र पिंजून काढणार आहेत. आदित्य ठाकरे येत्या शुक्रवारपासून 'जन आशीर्वाद यात्रे'ला सुरुवात करणार आहेत. अंबाबाईच्या दर्शनानंतर कोल्हापूरातून या यात्रेला सुरुवात होईल. विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आदित्य यांची ही यात्रा शिवसेनेसाठी महत्त्वाची ठरणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस १ ऑगस्टपासून विकास यात्रा काढणार आहेत. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर वातावरण निर्मिती करुन पाच वर्षातील कामं लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून केला जाणार आहे. मात्र मुख्यमंत्र्यांची विकास यात्रा सुरू होण्याआधीच आदित्य ठाकरे जन आशीर्वाद यात्रेला सुरुवात करतील. येत्या शुक्रवारपासून या यात्रेला आरंभ होईल. कोल्हापूरातील अंबाबाईचा आशीर्वाद घेऊन या यात्रेला सुरुवात होईल. कोल्हापूरातील दोन्ही लोकसभा मतदारसंघांमध्ये यंदाच्या निवडणुकीत शिवसेनेला यश मिळालं आहे. लोकसभा निवडणुकीत भरभरुन मतदान करणाऱ्यांचे आभार मानण्यासाठी आणि मतदान न केलेल्यांची मनं जिंकण्यासाठी आदित्य ठाकरे 'जन आशीर्वाद यात्रा' काढणार आहेत. सध्या शिवसेना, भाजपामध्ये सगळं काही आलबेल असल्याचं दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडून सांगितलं जात आहे. मात्र तरीही शिवसेना कोणत्याही प्रकारचा धोका पत्करणाच्या मनस्थितीत नाही. २०१४ मध्ये लोकसभा निवडणूक एकत्र लढणाऱ्या शिवसेना, भाजपाची युती विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर तुटली होती. हा धोका टाळण्यासाठी शिवसेना कामाला लागली आहे.  

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाDevendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसBJPभाजपा