शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
3
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
4
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
5
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
6
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
7
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
8
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
9
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
10
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
11
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
12
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
13
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
14
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
15
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
16
राहुरीत शरद पवार गटाचा उमेदवार ठरला, गोविंद मोकाटे निवडणूक लढवणार, प्राजक्त तनपुरेंची माघार?
17
७ दिवसांत दुप्पट झाला 'हा' शेअर; १००% पेक्षा अधिक वाढली किंमत, IPL टीमची मालक आहे कंपनी
18
इराण-इस्रायल संघर्षाचा भारतीय PMI वर परिणाम! सर्व्हिस सेक्टरची गती मंदावली; महागाईने कंबरडे मोडणार?
19
सलग तीन पराभवनानंतर CSK साठी गुड न्यूज, धोनी आणि ब्रेव्हिस ‘या’ सामन्यातून करणार पुनरागमन 
20
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
Daily Top 2Weekly Top 5

युतीच्या प्रचाराचा नारळ ‘अंबाबाई ’ला साक्षी ठेवून 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 19, 2019 20:24 IST

२४ मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह युतीचे सगळे खासदार, आमदार व संघटनात्मक पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत.

ठळक मुद्देकोल्हापूरात घेणार शपथ : प्रचारात नाट्यनिर्मितीची परंपरा कायमपुण्यातूनही या कार्यक्रमासाठी अनेकजण जाणार असून त्याची तयारी सुरू बैठका, प्रचाराचे नियोजन, बूथ कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण, मतदार याद्यांचे परीक्षण अशी सर्व कामे सुरूभाजपाने तयार केली ९४४ मतदान केंद्रांवर मिळून तब्बल १९ हजार कार्यकर्त्यांची मोठी फळीच

पुणे : साडेचार वर्षांच्या खडाखडीनंतर झालेल्या भारतीय जनता पार्टी-शिवसेनेच्या युतीच्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा नारळ यावेळी कोल्हापूरला अंबाबाईच्या चरणी वाढवण्यात येणार आहे. २४ मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यासह युतीचे सगळे खासदार, आमदार व संघटनात्मक पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. पुण्यातूनही या कार्यक्रमासाठी अनेकजण जाणार असून त्याची तयारी सुरू करण्यात आली आहे.भाजपाचे शहराध्यक्ष योगेश गोगावले यांनी ही माहिती दिली. पुण्यातील खासदार, आमदार यांच्याबरोबरच संघटनेतील तसेच पुणे महापालिकेतील अनेक पदाधिकारी कोल्हापूरला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोल्हापूरच्या महालक्ष्मी अंबाबाईचे आशिर्वाद घेऊन युती राज्यातील आपल्या प्रचारास सुरूवात करणार आहे. दोन्ही पक्षांचे उमेदवार जाहीर होण्यास विलंब होत आहे, त्यामुळे कार्यकर्ता स्तरावर आलेली शिथिलता कोल्हापूरला सुरूवात करणार असल्यामुळे निघून जाईल असा विश्वास गोगावले यांनी व्यक्त केला. विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराची सुरूवात भाजपाने थेट रायगड गाठून छत्रपती शिवाजी महाराजांचे दर्शन घेऊन केली होती. शिवसेनेबरोबरची युती त्यावेळी तुटली होती. त्यामुळे या गोष्टीला चांगलीच प्रसिद्धी मिळाली. छत्रपतींचा आशीर्वाद घेत आहोत अशाी त्याची जाहिरात केली गेली. त्यानंतर पुणे महापालिकेच्या निवडणूकीचा प्रचार भाजपाने सिंहगड ला जाऊन शहर विकासाची शपथ घेऊन केली. त्यालाही जोरदार प्रसिद्धी मिळाली. आता यावेळी कोल्हापूरची निवड करण्यात आली आहे. कोल्हापूरची अंबाबाई महाराष्ट्राचे आराध्यदैवत आहे. त्यामुळे कोल्हापूर निवडण्यात आले असे भाजपा वर्तुळात सांगण्यात आले. दरम्यान पुणे लोकसभा मतदारसंघातील उमेदवारी कोणाला हे निश्चित होत नसले तरीही त्याचा भाजपा संघटनेवर काहीही परिणाम झालेला नाही. संघटनेच्या बैठका, प्रचाराचे नियोजन, बूथ कार्यकर्त्यांचे प्रशिक्षण, मतदार याद्यांचे परीक्षण अशी सर्व कामे सुरू असून त्याबरोबरच पक्षाच्या केंद्रीय तसेच राज्य शाखेने दिलेले जाहीर कार्यक्रमाही नियमाने करण्यात येत आहेत. लोकसभेच्या एकूण १ हजार ९४४ मतदान केंद्रांवर मिळून तब्बल १९ हजार कार्यकर्त्यांची एक मोठी फळीच भाजपाने तयार केली आहे. त्यांच्याबरोबर संघटनेकडून नियमीत संपर्क केला जात असतो. 

टॅग्स :PuneपुणेPoliticsराजकारणShiv SenaशिवसेनाBJPभाजपाLok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक