पुण्यात 'इसिस'च्या संशयावरून ताब्यात घेण्यात आलेल्या तरूणाची सुटका

By Admin | Updated: April 7, 2016 15:21 IST2016-04-07T15:19:57+5:302016-04-07T15:21:42+5:30

कुख्यात दहशतवादी संघटना इसिसशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुणे विमानतळावरून ताब्यात घेण्यात आलेल्या तरूणाची सुटका करण्यात आली.

Yunus released in Pune on suspicion of 'Isis' | पुण्यात 'इसिस'च्या संशयावरून ताब्यात घेण्यात आलेल्या तरूणाची सुटका

पुण्यात 'इसिस'च्या संशयावरून ताब्यात घेण्यात आलेल्या तरूणाची सुटका

ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. ७ - कुख्यात दहशतवादी संघटना इसिसशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन मंगळवारी ताब्यात घेण्यात आलेल्या इस्माईल मुसब अब्दुल रौफ या तरूणाची अखेर सुटका करण्यात आली आहे. मूळचा कर्नाटकातील भटकळ जिल्ह्यातील रहिवासी असून दुबईला जाण्यासाठी पुणे विमानतळावर आला होता. त्यावेळी एनआयएने (राष्ट्रीय तपास यंत्रणा) त्याला मंगळवारी सायंकाळी ताब्यात घेतले. मात्र त्याची चौकशी केल्यानंतर एका दिवसाने त्याची सुटका करण्यात आली. 
गेल्या काही दिवसांपासून अब्दुल रौफ ई-मेलच्या माध्यामातून इसिसच्या काही संशयितांशी संपर्कात असल्याचा संशय होता. राष्ट्रीय तपास संस्थेसह गुप्तचर खाते (आयबी) त्याच्या हालचालींवर बारीक नजर ठेवून होते. तो मंगळवारी सायंकाळी पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरुन दुबईला जाण्यास निघाला असता त्याला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले. 
मात्र रऊफला अटक नव्हे तर चौकशीसाठी फक्त काही काळ ताब्यात घेण्यात आल्याचे एनआयच्या सूत्रांनी स्पष्ट केले. तसेच त्याला चौकशीसाठी परत बोलावले जाण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी नमूद केले.
गेल्या काही महिन्यांमध्ये राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) इसिसशी संबंधांच्या संशयावरून देशभरातून १४ तरूणांना अटक करण्यात आली होती. त्यात ठाणे आणि मुंबई परिसरातील तरूणांचा समावेश होता
 

 

Web Title: Yunus released in Pune on suspicion of 'Isis'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.