रेल्वेतून पडून तरुणाचा पाय तुटला

By Admin | Updated: August 13, 2016 21:24 IST2016-08-13T21:24:57+5:302016-08-13T21:24:57+5:30

धावत्या रेल्वेतून पडून एका तरुणाचा डावा पाय तुटल्याने तो गंभीर जखमी झाला

The youth's legs were broken by falling from the train | रेल्वेतून पडून तरुणाचा पाय तुटला

रेल्वेतून पडून तरुणाचा पाय तुटला

>- ऑनलाइन लोकमत 
सोलापूर, दि. 13 - धावत्या रेल्वेतून पडून एका तरुणाचा डावा पाय तुटल्याने तो गंभीर जखमी झाला. शनिवारी दुपारी १२ च्या सुमारास पाकणीजवळील रेल्वे ट्रॅकवर ही घटना घडली. सुरेश गंगाराम भुसनूर (वय- ३०, रा. हिरज, ता. उत्तर सोलापूर) असे या तरुणाचे नाव आहे.
 
पुण्याहून सोलापूरकडे येणाºया रेल्वे पॅसेंजरमधून सुरेश गंगाराम भुसनूर (वय- ३०) हा प्रवास करीत होता. सोलापूर जवळ आले म्हणून तो प्रवेशद्वारासमोर थांबला होता. गाडी पाकणीजवळील रेल्वे ट्रॅक दगड क्र. ४४१/९ येथे आल्यानंतर अचानक त्याचा तोल गेला, यात त्याचा डाव्या पाय मांडीपासून तुटला. रक्तबंबाळ झालेल्या अवस्थेत त्याला आर. पी.एफ. जवान निरंजन जहागीरदार याने तातडीने सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. मांडीपासून वेगळा झालेला पाय धावत्या रेल्वे रुळाखाली चिरडला गेल्याने पोलिसांनी त्याचा शोध घेतला असता सापडला नाही. या घटनेची सोलापूर तालुका पोलीस ठाण्यात नोंद झाली आहे.
 

Web Title: The youth's legs were broken by falling from the train