नदीच्या पुरात युवक गेला वाहून
By Admin | Updated: July 11, 2016 19:37 IST2016-07-11T19:37:00+5:302016-07-11T19:37:00+5:30
तालुक्यात सतत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अरुणावती नदी दुथडी भरून वाहत आहे

नदीच्या पुरात युवक गेला वाहून
ऑनलाइन लोकमत
मानोरा, दि. 11 - तालुक्यात सतत तीन दिवसांपासून सुरू असलेल्या पावसामुळे अरुणावती नदी दुथडी भरून वाहत असून, या नदीच्या पुरात शहरातील सुनिल भोरकडे (२८) हा युवक वाहून गेल्याची घटना सोमवारी दुपारी ३.३० वाजताच्या सुमारास घडली.
सुनिल भोरकडे हा सोमवारी दुपारच्या सुमारास शेतातून मित्रासोबत परत येत असताना शहरालगतच्या हनुमान मंदीराजवळ असलेल्या नाल्याच्या बंधाऱ्यावरून नदीत पडला. यावेळी अरुणावती नदीला पूर आलेलाअसलयामुळे सुनिल त्या पुरात वाहून गेला. मानोराचे पोलिस पाटील गोपाल लाहोटी यांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी सनिल भोरकडेचा शोध घेणे सुरू केले; परंतु सायंकाळी ७ वाजेपर्यंत वृत्तलिहिस्तोवर त्याचा पत्ता लागू शकला नव्हता. मागील चार दिवसांपासून तालुक्यात सतत पाऊस सुरू असल्याने अरुणावती नदीसह तालुक्यातील नदी नाल्यांना पूर आला आहे.