लोहारा येथे युवकाची आत्महत्या, 6 जणांविरुध्द गुन्हा
By Admin | Updated: June 23, 2017 19:39 IST2017-06-23T19:39:59+5:302017-06-23T19:39:59+5:30
तीन दिवसांपासून बेपत्ता तरुणाने स्वत:च्या शेतात गळफास लावून अत्महत्याचे केल्याची घटना लोहारा तालुक्यातील कानेगाव येथे उघडकीस आली होती.

लोहारा येथे युवकाची आत्महत्या, 6 जणांविरुध्द गुन्हा
ऑनलाइन लोकमत
लोहारा(उस्मानाबाद), दि. 23 - तीन दिवसांपासून बेपत्ता तरुणाने स्वत:च्या शेतात गळफास लावून अत्महत्याचे केल्याची घटना लोहारा तालुक्यातील कानेगाव येथे उघडकीस आली होती. याप्रकरणी अत्महत्यास प्रवृत्त केल्याच्या आरोपावरून लोहारा पोलीस ठाण्यात सहाजणांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
लोहारा पोलीस ठाण्यात मयत पवन जावळे (वय २७) यांचे वडील बालााजी जावळे यांनी फिर्याद दिली आहे. यानुसार, ३ जून रोजी मयत पवन हा ट्रॅक्टर मागे घेत असताना विद्युत पोल पडला. यावरून संजय प्रल्हाद कांबळे, प्रल्हाद कांबळे, प्रल्हाद कांबळे यांच्या दोन मुली, लातूर येथील जावई आणि बाळासाहेब कांबळे यांनी त्यास मारहाण केली. तसेच याबाबत पोलीसात तक्रार दिल्यास तुझ्याविरुध्द अॅट्रासिटीचा गुन्हा दाखल करू, अशी धमकी दिली. यामुळे पवन याने आत्महत्या केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. यावरून वरील सहाजणांविरुध्द भादंवि कलम ३०६, ३४ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पो.नि. फुलचंद मेंगडे करीत आहेत.