विमा कार्यालयात युवतीची आत्महत्या
By Admin | Updated: June 24, 2016 00:42 IST2016-06-24T00:42:20+5:302016-06-24T00:42:20+5:30
मूर्तिजापूर येथील घटना.

विमा कार्यालयात युवतीची आत्महत्या
मूर्तिजापूर (जि. अकोला): येथील भारतीय जीवन विमा कार्यालयात एका २५ वर्षीय युवतीने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना २३ जून रोजी दुपारी ३ वाजताच्या सुमारास घडली. या घटनेने शहरात खळबळ उडाली आहे. मूर्तिजापूर येथील भारतीय जीवन विमा कार्यालयात कार्यरत असलेली माना येथील रहिवासी सुजाता कोकणे (२५) ही युवती दुपारी ३ वाजताच्या सुमारास कार्यालयात आली. बराच वेळ बसून राहिल्यानंतर तिने स्वच्छतागृहात जाऊन विष प्राशन केले. त्यानंतर कार्यालयातील सोफ्यावर येऊन बसल्यानंतर तिला वांती झाली. त्यानंतर तिच्या नाका-तोंडातून फेस येत असल्याचे पाहून शाखाधिकारी अलोणे यांनी त्याबाबत पोलिसांना तत्काळ कळविले. तसेच वरिष्ठांना सूचना दिल्या. सुजाता हिची गंभीर प्रकृती पाहता तिला तत्काळ लक्ष्मीबाई देशमुख उपजिल्हा रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले. तेथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. सदर तरुणीने त्याच कार्यालयात कार्यरत एका अधिकार्याविरुद्ध लैंगिक शोषण केल्याबाबत तक्रार केली होती. तसे १८ नोव्हेंबर २0१५ रोजी तिने स्टॅम्प पेपरवर लिहून ठेवले आहे. या प्रकरणी मूर्तिजापूर पोलीस अधिक तपास करीत आहे. हे वृत्त लिहीपर्यंत याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता.