युवकांनी व्यसनांबाबत सतर्क राहावे

By Admin | Updated: June 30, 2016 02:43 IST2016-06-30T02:43:58+5:302016-06-30T02:43:58+5:30

नेरुळ डी. वाय. पाटील रुग्णालयात व्यसनमुक्तीवर आधारित जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

Youth should be cautious about addiction | युवकांनी व्यसनांबाबत सतर्क राहावे

युवकांनी व्यसनांबाबत सतर्क राहावे


नवी मुंबई : अमली पदार्थ सेवन विरोधी दिवसानिमित्त सोमवारी नेरुळ डी. वाय. पाटील रुग्णालयात व्यसनमुक्तीवर आधारित जनजागृतीपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. डी. वाय. पाटील हॉस्पिटल अ‍ॅण्ड रिसर्च सेंटर आणि वाशीतील अन्वय व्यसनमुक्ती केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात तरुणांना व्यसनांचे दुष्परिणाम तसेच व्यसनमुक्तीचे फायदे याविषयी मार्गदर्शन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आणि मार्गदर्शक म्हणून उपस्थित नवी मुंबई पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी विद्यार्थ्यांना व्यसनांबाबत सतर्क राहण्याचा सल्ला दिला.
तरुणांचा देश अशी ओळख असलेल्या भारतातील तरुण पिढीने व्यसनांबाबतीत सावध असणे अतिशय गरजेचे आहे, अशी प्रतिक्रिया नगराळे यांनी मांडली. अमली पदार्थांच्या सेवनाने होणारे दुष्परिणामांची माहिती या मार्गदर्शन शिबिराच्या माध्यमातून देण्यात आली. पालक, शिक्षक, समुपदेशक, पोलीस तसेच स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून परिवर्तन करता येऊ शकते, असेही नगराळे यांनी सांगितले.
मानसोपचार विभागाच्या प्राध्यापिका डॉ. क्रांती कदम यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून व्यसनांविषयीची अभ्यासपूर्ण मांडणी केली. अन्वय व्यसनमुक्तीचे संचालक डॉ. अजित मगदूम यांनी पंजाब, मणिपूर, मिझोराम, हरियाणा, राजस्थान, महाराष्ट्र, कर्नाटक आदी राज्यातील तसेच मुंबई, हैदराबाद यासारख्या शहरातील व्यसनांचे वास्तव विषद केले. यावेळी आदर्श नय्यर, सतीश मोरे, समाजसेविका वृषाली मगदूम, अनिल लाड, ज्ञानेश भेगले, सुषमा बिडवे, डी. वाय. पाटील रुग्णालयाचे डॉ. शिरीष पाटील, डॉ. श्याम मोरे आणि मेडिकलचे विद्यार्थी उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Youth should be cautious about addiction

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.