तरुणाची हत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 4, 2016 05:32 IST2016-11-04T05:32:57+5:302016-11-04T05:32:57+5:30

घरात झोपलेल्या तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना गुरुवारी पहाटे गोवंडी शिवाजीनगरमध्ये घडली

Youth murdered | तरुणाची हत्या

तरुणाची हत्या


मुंबई : घरात झोपलेल्या तरुणाची गळा चिरून हत्या करण्यात आल्याची घटना गुरुवारी पहाटे गोवंडी शिवाजीनगरमध्ये घडली आहे. मलिक मेराज (२५) असे मृत तरुणाचे नाव असून, याप्रकरणी शिवाजीनगर पोलिसांनी अज्ञात इसमावर गुन्हा दाखल करत तपास सुरू केला आहे. गोवंडीतील बैंगनवाडी परिसरात मलिक गेल्या दोन वर्षांपासून राहत होता. याच घरात त्याचा बॅग तयार करण्याचा कारखाना असून बुधवारी रात्री काम आटोपून तो कारखान्यामध्ये झोपला होता. कारखान्यातील इतर कारागिर वरच्या माळ््यावर झोपले होते. पहाटे चारच्या सुमारास त्यांना आवाज आल्यानंतर ते खाली आले असता मलिक रक्ताच्या थारोळयात पडल्याचे आढळले. शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत मृतदेह शवविच्छेदनासाठी राजावाडी रुग्णालयात पाठवला.

Web Title: Youth murdered