अग्रोळी तलावात तरुणाचा बुडून मृत्यू

By Admin | Updated: July 14, 2017 05:10 IST2017-07-14T05:10:34+5:302017-07-14T05:10:34+5:30

पोहता येत नसल्यामुळे अग्रोळी गावातील तलावात बुडून गुरुवारी तरुणाचा मृत्यू झाला

The youth drowned in Agroli lake | अग्रोळी तलावात तरुणाचा बुडून मृत्यू

अग्रोळी तलावात तरुणाचा बुडून मृत्यू

लोकमत न्यूज नेटवर्क
नवी मुंबई : पोहता येत नसल्यामुळे अग्रोळी गावातील तलावात बुडून गुरुवारी तरुणाचा मृत्यू झाला. अजय गायकवाड (१९) असे त्याचे नाव अहे. त्याचा शोध घेण्यासाठी घटनास्थळी बचाव पथक दाखल झाले होते. मात्र रात्री उशिरापर्यंत बचाव पथकाला या त्याचा थांगपत्ता लागला नाही.
अजय आणि त्याचे सहा सहकारी गुरुवारी मानखुर्द येथून नवी मुंबईत आले. दुपारी अग्रोळी परिसरात आल्यानंतर तलाव पाहून अजय आणि मित्रांना पोहण्याची इच्छा झाली. अजयला पोहता येत नसल्याने मित्रांनी त्याला बाकावर बसण्यास सांगितले. मित्रांना पोहताना बघून उत्साहात त्याने सर्वांची नजर चुकवून पाण्यात उडी मारली आणि तो बूडाला.

Web Title: The youth drowned in Agroli lake