शहरं
Join us  
Trending Stories
1
'बगराम हवाई तळ देणार नाही, जर तुम्हाला आमच्यासोबत...'; अफगाणिस्तानच्या मंत्र्याचा ट्रम्प यांना 'मेसेज', पाकिस्तानलाही इशारा
2
चीनचं अमेरिकेला जशास तसं प्रत्युत्तर; चिनी जहाजांवर शुल्क लादताच उचललं मोठं पाऊल!
3
लष्करात नेमणूक झाल्यावर भव्य मिरवणूक, जंगी स्वागत; सत्य समजताच सरकली पायाखालची जमीन
4
Maria Corina Machado: व्हेनेझुएलाची 'आयरन लेडी', शांततेचं नोबेल मिळालेल्या मारिया कोरिना मचाडो कोण आहेत?
5
आठ युद्धं थांबवली तरी पुरस्कार समितीने डोनाल्ड ट्रम्प यांना शांततेचा नोबेल का नाकारला? समोर येताहेत ही कारणं
6
"मुंबईतील भूखंड उद्योगपतींना कवडीमोल दराने देण्याचा महायुती सरकारचा सपाटा, तर सर्वसामन्यांच्या घरांकडे दुर्लक्ष’’, काँग्रेसचा आरोप
7
सात युद्धं थांबवल्याच्या 'बढाया' मारणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना ठेंगा; 'शांततेचं नोबेल' लोकशाहीवादी मारिया मचाडो यांना
8
IND vs WI 2nd Test Day 1 Stumps: 'ओपनिंग डे'ला टीम इंडियाचा 'यशस्वी' शो! साई सुदर्शनही चमकला; पण...
9
'बदला घेणारच'; भैय्या गायकवाडची शिवीगाळ करत धमकी, टोलनाक्यावर बेदम मारहाणीचा व्हिडीओ व्हायरल
10
Bobby Darling : "मी परत आलेय, मला एक चांगला रोल द्या", बॉबी डार्लिंगची विनंती, अवस्था पाहून बसेल मोठा धक्का
11
उल्हासनगरात धोबीघाट रस्त्यावर ६ महिन्यांपासून जलवाहिनी गळती; हजारो लिटर पाणी वाया!
12
Astro Tips: व्यवसायात भरभराट हवीय? फक्त तीन शनिवार करा पिवळ्या मोहरीचा प्रभावी उपाय!
13
शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? सलग दुसऱ्या महिन्यात म्युच्युअल फंडातील पैशांचा ओघ घटला
14
भारीच! कोणत्याही भाषेतील रील आता हिंदीमध्ये डब करता येणार! इंस्टाग्राम आणि फेसबुकमध्ये गेम-चेंजर AI फिचर
15
नवीन मालकाच्या अपघाताचा ४ लाखांचा भुर्दंड जुन्या मालकाला! गाडी विकताना तुम्ही तर 'ही' चूक केली नाही ना?
16
एक फूट जमिनीसाठी नात्याचा 'खून'; आई-वडील, भावंडांनी घेतला तरुणाचा जीव, पत्नी ९ महिन्यांची प्रेग्नेंट
17
कवडीच्या भावात मिळतोय ५५ इंच 4K एलईडी स्मार्ट टीव्ही, ऑफर पाहून व्हाल खूश!
18
IND vs WI: दक्षिण आफ्रिकेची भारताविरुद्ध उल्लेखनीय कामगिरी, जुना विक्रम मोडला!
19
स्वप्न शास्त्र: स्वप्नात सुंदर महिला दिसणे हे कसले संकेत? नशीब फळफळणार की गोत्यात येणार?
20
"आम्हालाही अशा तंत्रज्ञानाची गरज," 'या' भारतीय अ‍ॅपचे फॅन झाले ब्रिटनचे पंतप्रधान

काँग्रेसच्या विजयासाठी युवक काँग्रेस जोरदार भिडली!

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 19, 2019 04:51 IST

युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे म्हणाले, भेटी-गाठी, कॉर्नर सभा, प्रचार सभा, पदयात्रा, युवक मेळावे या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रचाराचे रान उठविले.

मुंबई : विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयासाठी युवक काँग्रेसही मैदानात उतरली. मी स्वत: १०० पेक्षा जास्त सभा, कॉर्नर सभा, पदयात्रांच्या माध्यमातून अवघा महाराष्ट्र ढवळून काढला. युवक जाहीरनाम्यातील बेरोजगार तरुणांना दरमहा ५ हजार रुपये बेरोजगार भत्ता यासह लोकांच्या जिव्हाळ्याचे आणि विकासाचे मुद्दे घेऊन उमेदवार निवडून आणायचेच, या निश्चयाने युवक काँग्रेसचे लाखो कार्यकर्ते आणि पदाधिकारी भूमिका बजावत आहेत, अशी माहिती युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी दिली.

युवक काँग्रेसचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सत्यजीत तांबे म्हणाले, भेटी-गाठी, कॉर्नर सभा, प्रचार सभा, पदयात्रा, युवक मेळावे या माध्यमातून महाराष्ट्रभर प्रचाराचे रान उठविले. आर्थिक मंदी, महागाई, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, महिलांवरील अत्याचार, नोटबंदी आणि जीएसटीचा व्यापारी आणि उद्योजकांना बसलेला फटका, भाजपच्या राजवटीत उद्योग - व्यवसायाची झालेली घसरण आणि सरकारी बँकांमध्ये झालेले घोटाळे आदी विषयांवरून केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारची पोलखोल करणाऱ्या आक्रमक भाषणांना राज्यभरातील मतदारांकडून विशेषत: युवा वगार्तून प्रतिसाद मिळत आहे.

विधानसभेचे सूक्ष्म नियोजनमहाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेस अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर सत्यजीत तांबे यांनी केंद्रातील मोदी सरकारविरुद्ध निषेधासन, महाराष्ट्रात दुष्काळ जाहीर करण्याच्या मागणीसाठी प्रत्येक तहसील कार्यालयावर मोर्चा तसेच केंद्र आणि राज्यातील भाजप सरकारच्या चुकीच्या धोरणांविरोधात रस्त्यावर उतरून अतिशय आक्रमक आंदोलने करून भाजप सरकारविरुद्ध जनतेमध्ये जनमत तयार करण्याबरोबरच युवक काँग्रेसचे कार्यकर्ते आणि पदाधिकाºयात चैतन्य निर्माण केले. लोकसभा निवडणुकीतील पराभवाने खचून न जाता ४ महिने अगोदरच विधासभा निवडणुकीची तयारी सुरु केली. युवा मंथन शिबीर, सुपर - ६० अभियान, ‘वेकअप महाराष्ट्र : उद्यासाठी आत्ता’ अभियान, सोशल मीडियावरून भाजप सरकारविरुद्ध आक्रमक आणि केंद्र आणि राज्यातील काँग्रेस सरकारने केलेल्या विधायक आणि विकासकामांची प्रसिद्धी आणि युवक जाहीरनाम्याच्या माध्यमातून युवक काँग्रेसच्या बूथस्तरीय ते राज्यस्तरीय पदाधिकाऱ्यांना ठोस आणि नियोजनबद्ध जबाबदाºयांचे वाटप करून निवडणुकीचे सूक्ष्म नियोजन केले.

सुपर - ६० अभियान२०१४ च्या विधानसभा निवडणुकीत विजयी झालेले काँग्रेसचे विद्यमान आमदार आणि अगदी थोड्या मताधिक्याने पराभव झालेल्या विधानसभेच्या अशा एकूण ६० जागा कोणत्याही परिस्थितीत जिंकायच्याच असा निर्धार करून महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून सुपर - ६० अभियानाचा जन्म झाला. हे मिशन पूर्ण करण्यासाठी मुंबई येथे ५ जुलै रोजी महाराष्ट्रातील संबंधित युवक काँग्रेस जिल्हाध्यक्ष आणि प्रदेश पदाधिकारी, विधासभा अध्यक्ष यांची एकत्रित बैठक घेण्यात आली. या राज्यस्तरीय बैठकीत ६० जागा जिंकण्यासाठी रणनीती आखण्यात आली आणि ‘सुपर-६०’ मिशन पूर्ण करण्यासाठी विभागनिहाय जबाबदाºया निश्चित करण्यात आल्या. सुपर - ६० अभियानांतर्गत निश्चित केलेल्या विधानसभा मतदारसंघात युवक काँग्रेसचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी गेल्या एक महिन्याच्या कालावधीत घरोघरी भेटी, युवक जाहीरनामा लोकांपर्यंत पोहोचविणे आणि काँग्रेस आघाडीचे सरकार सत्तेवर आल्यानंतर कोणत्या कल्याणकारी योजना राबविल्या जाणार आहेत, याची लोकांना कल्पना देणे आदी उपक्रमाद्वारे सुपर - ६० मतदारसंघात प्रचाराचे रान उठविले आहे. सुपर-६० अभियानात समावेश असलेल्या विधानसभा मतदारसंघातील काँग्रेस उमेदवारांच्या विजयासाठी दस्तुरखुद्द सत्यजीत तांबे अविरतपणे आणि नियोजनबद्ध प्रचारयंत्रणा राबवत असून पहिल्या आणि दुसºया फेरीत या सर्व मतदारसंघात तांबे यांनी सभा घेतल्या असून भाजप सरकारविरुद्ध वातावरण निर्मिती केली आहे.

अभिनव युवक जाहीरनामाविधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने ‘वेकअप महाराष्ट्र : उद्यासाठी आत्ता’ या अभियानांतर्गत महाराष्ट्रातील सुमारे ३ कोटी युवकांशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संवाद साधून खास युवकांसाठी युवक जाहीरनामा तयार केला आहे. अशाप्रकारचा केवळ युवकांना केंद्रबिंदू ठेऊन युवकांसाठी तयार केलेला हा देशातील पहिलाच युवक जाहीरनामा आहे.राज्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात युवक जाहीरनाम्याचे वितरण केले जात आहे. एकीकडे सत्ताधारी पक्षाला लोकांना सांगण्यासारखे काहीच नाही अशी परिस्थिती असताना युवक काँग्रेसने मात्र युवकांना ५ हजार रुपये बेरोजगार भत्ता, सर्व तरुणांना पदवीपर्यंत मोफत सार्वजनिक वाहतूक सेवा, शेतकºयांना संपूर्ण कर्जमाफी, खासगी आणि सार्वजनिक प्रकल्पामध्ये स्थानिक भूमिपुत्रांना ८० टक्के नोकºयांत आरक्षण आणि पदवीपर्यंत सर्व दिव्यागांना मोफत शिक्षण, सप्टेंबर २०१९ पर्यंत विद्यार्थ्यांनी घेतलेले सर्व शैक्षणिक कर्ज माफ करणार ही काँग्रेसची आश्वासने बेरोजगार तरुण, महिला, शेतकरी आणि सर्वसामान्य मतदारांना आकर्षित करीत आहेत.तरुणांना जागविणारेवेकअप महाराष्ट्रमहाराष्ट्रातील कोट्यवधींच्या संख्येतील युवक म्हणजे, राष्ट्राचे उज्ज्वल भविष्य आणि राष्ट्राची अमूल्य संपत्तीच. युवकांच्या मनातील आणि स्वप्नातील उद्याच्या महाराष्ट्राला हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांच्या संकल्पनेतून वेकअप महाराष्ट्र अंतर्गत शाहिरी स्पर्धा, स्टिक युवर व्हॉइस, युवा क्रीडा संवाद, युवा संवाद, चर्चासत्र, युवक मेळावे आणि मैं भी नायक...एक दिवसासाठी मुख्यमंत्री !!, ही अभिनव स्पर्धा घेतली. या स्पर्धेच्या निमित्ताने महाराष्ट्रातील सुमारे ३ कोटी युवकांशी प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष संपर्क साधून देशात पहिल्यांदाच युवकांसाठी खास युवक जाहीरनामा तयार केला आहे. ‘मैं भी नायक : एक दिवसासाठी मुख्यमंत्री’ या स्पर्धेतील विजेत्यांना पंजाब, राजस्थान, छत्तीसगड या राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत पूर्ण एक दिवस राहून कामकाज पाहण्याची सुवर्णसंधी देण्यात आली.

जागा हो... गाणे तरुणाईत हिट‘वेकअप महाराष्ट्र : उद्यासाठी आत्ता’ या अभियानाच्या प्रसिद्धीसाठी एक टायटल साँग तयार करण्यात आले. प्रसिद्ध पार्श्वगायक आदर्श शिंदे, प्रसेनजीत कोसंबी आणि कार्तिकी गायकवाड यांनी या गाण्याला आपला सुमधुर आवाज दिला आहे. प्रणित कुलकर्णी यांनी या गाण्याचे लेखन केले असून त्याला अविनाश विश्वजित यांनी ते संगीतबद्ध केले आहे, असे तांबे यांनी सांगितले.

टॅग्स :congressकाँग्रेसMaharashtra Assembly Election 2019महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2019