मुंबईत 19 व्या मजल्यावरून उडी मारून तरुणाची आत्महत्या
By Admin | Updated: April 3, 2017 23:41 IST2017-04-03T23:07:49+5:302017-04-03T23:41:12+5:30
वांद्रे परिसरातील हॉटेल ताजच्या 19 मजल्यावरून उडी मारून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज संध्याकाळी

मुंबईत 19 व्या मजल्यावरून उडी मारून तरुणाची आत्महत्या
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 3 - वांद्रे परिसरातील हॉटेल ताजच्या 19 मजल्यावरून उडी मारून एका तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना आज संध्याकाळी घडली आहे. अंमली पदार्थांच्या व्यसनाला कंटाळून या तरुणाने आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. तसेच या तरुणाने आत्महत्या करणापूर्वी एक व्हिडिओ काढला असून, सुसाइड नोटही मागे ठेवली आहे.
अर्जुन भारद्वाज (24) असे आत्महत्या करणाऱ्या तरुणाचे नाव असून, तो मुंबईतील एनएम महाविद्यालयाचा विद्यार्थी होता. त्याला अंमली पदार्थांचे व्यसन जडले होते. दरम्यान, आपण अंमली पदार्थांच्या आहारी गेले असून, त्यामुळे मला जीवनाचा कंटाळा आला आहे. या व्यसनाधीनतेला कंटाळून मी आत्महत्या करत आहे ,असे अर्जुनने आत्महत्या करण्यापूर्वी लिहिलेल्या चिठ्ठीत म्हटले आहे.
अर्जुनचे वडील बंगळुरूमधील प्रसिद्ध व्यावसायिक आहेत. दरम्यान, पोलिसांनी अर्जुनच्या कुटुंबीयांशी संपर्क साधला असून, प्राथमिक तपासाला सुरुवात केली आहे. अर्जुनच्या शवविच्छेदन अहवालात त्याच्या रक्तामध्ये अंमली पदार्थाचे अंश आढळले आहेत.