सांगवीत गोळी झाडून तरुणाची आत्महत्या

By Admin | Updated: January 25, 2016 00:54 IST2016-01-25T00:54:02+5:302016-01-25T00:54:02+5:30

तणावातून सांगवीत एका तरुणाने शनिवारी रात्री एकच्या सुमारास स्वत:वर पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली. एका तरुणीबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये

The youth commits suicide by shooting a shot | सांगवीत गोळी झाडून तरुणाची आत्महत्या

सांगवीत गोळी झाडून तरुणाची आत्महत्या

पिंपरी : तणावातून सांगवीत एका तरुणाने शनिवारी रात्री एकच्या सुमारास स्वत:वर पिस्तुलातून गोळी झाडून आत्महत्या केली. एका तरुणीबरोबर लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहणाऱ्या देवेंद्र गीतेश्वर गोरे (वय २४, रा. साई चौक, सांगवी) या तरुणाचे एकाशी भांडण झाले होते. त्या रागातून भांडण झालेल्या तरुणाला मारण्यासाठी त्याने पिस्तूल घेतले होते. मद्यपान केल्यानंतर त्याने स्वत:वरच गोळी झाडली.
देवेंद्र काही दिवसांपासन एका तरुणीबरोबर राहत होता. त्याचे एकाशी भांडण झाले होते. ज्याच्याशी भांडण झाले, त्या इसमाचा तो शोध घेत होता. त्याला मारण्यासाठी पिस्तूलही आणले होते. ज्याला मारायचे, तो सापडत नसल्याने देवेंद्र अस्वस्थ होता. शनिवारी मद्यपान केल्यानंतर त्याने बंदुकीतून डोक्यात गोळी मारली. त्याच्यासोबत राहत असलेल्या तरुणीने पोलिसांना माहिती दिली. आत्महत्येच्या घटनेमागे आणखी काही कारण आहे का, याचा शोध पोलीस घेत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: The youth commits suicide by shooting a shot