युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या बीएमडब्ल्यूचा अपघात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 15, 2017 17:45 IST2017-01-15T15:26:05+5:302017-01-15T17:45:00+5:30
युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कारला बांद्रा पुर्व येथे अपघात अपघात झाला आहे. दुपारी मातोश्रीवरुन निघाल्यानंतर हा अपघात झाला आहे

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरेंच्या बीएमडब्ल्यूचा अपघात
style="text-align: justify;">ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 15 - युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या कारला वांद्रे पूर्व येथे अपघात झाला आहे. दुपारी मातोश्रीवरुन निघाल्यानंतर हा अपघात झाला. अपघातात कोणी जखमी झाल्याचं वृत्त नाही.
आदित्य ठाकरे बीएमडब्ल्यूने निघाले असता खेरवाडी सिग्नलजवळ समोरून एका खासगी कारने धडक दिल्याने हा अपघात झाला आहे. या अपघातात आदित्य ठाकरे यांच्या बीएमडब्ल्यू कारचे नुकसान झाले आहे. कारच्या बोनेटचं नुकसान झालंय, तर समोरून धडक देणाऱ्या कारच्या दरवाजांचे नुकसान झाले आहे.
या अपघाताबाबत स्थानिक ट्रॅफिक पोलिसांनी धडक देणाऱ्या कार चालकाला दंड आकारला आहे.