आंबोली घाटात चंदगडमधील युवक पाय घसरुन दरीत कोसळला

By Admin | Updated: August 16, 2016 20:50 IST2016-08-16T20:50:44+5:302016-08-16T20:50:44+5:30

आंबोली घाटात चंदगडमधील एक युवकाचा पाय घसरुन दरीत कोसळल्याची घटना घडली. ही दुर्घटना सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घडली.

The youth of Chandigarh, falling in the valley of Amboli, collapsed in the valley | आंबोली घाटात चंदगडमधील युवक पाय घसरुन दरीत कोसळला

आंबोली घाटात चंदगडमधील युवक पाय घसरुन दरीत कोसळला

>ऑनलाइन लोकमत
सावंतवाडी, दि. १६ - आंबोली घाटात चंदगडमधील एक युवकाचा पाय घसरुन दरीत कोसळल्याची घटना घडली. ही दुर्घटना सायंकाळी सव्वासातच्या सुमारास घडली. 
गोव्याहून चंदगडला पवन चौगुले आणि शशिकांत देवखुळे हे युवक दुचाकीवरुन जात असताना आंबोली घाटात ज्या ठिकाणी मुख्य धबधबा आहे. त्या ठिकाणी दोघेजण थांबले होते. त्यावेळी त्यांच्या गाडीची चावी दरीच्या कडेला पडली. यावेळी पवन चौगुले गाडीची चावी शोधत असताना त्याचा पाय घसरुन २५० फूट दरीत कोसळला. दरम्यान, पवन चौगुले याचा शोध घेण्यासाठी पोलिस आणि अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी दाखल झाले असून शोधकार्य सुरु आहे. घाटात धुके आणि अंधार असल्यामुळे शोधकार्यात अडथळा येत आहे. 
गेल्या महिनाभरातील ही दुसरी घटना आहे. याआधी बेळगाव येथील एका युवकाचा दरीत पडून मृत्यू झाला होता. 

Web Title: The youth of Chandigarh, falling in the valley of Amboli, collapsed in the valley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.