शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
मालेगावमध्ये ईडीचे छापे; जप्त केली बांगलादेशी रोहिंग्यांची बनावट कागदपत्रे आणि दाखले
4
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
5
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
6
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
7
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
8
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
9
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
10
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

आता घर बसल्या करता येणार आपल्या मिळकतीचे मूल्यांकन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2019 14:24 IST

दररोज राज्यातील तब्बल ५० ते ६० हजार नागरिकांना होणार फायदा

ठळक मुद्देनवीन वर्षांत १ जानेवारीपासून संपूर्ण राज्यात प्रणालीची अंमलबजावणीनोंदणी व मुद्रांक विभागाचा कारभार पारदर्शक करणे हाच उद्देशराज्यात दररोज तब्बल ११ हजार पेक्षा अधिक विविध प्रकारच्या मिळकतीची नोंदणी ऑनलाईन पध्दतीने ‘ई- व्हेल्युएशन’प्रणालीद्वारे नागरिकांना मिळकतीचे बाजारमूल्य कळणार

सुषमा नेहरकर-शिंदे पुणे : नागरिकांना कोणतीही मालमत्ता, मिळकतीची नोंदणी करण्यासाठी दुय्यम निंबधक कार्यालयांमध्ये जाऊन आपल्या प्रॉपर्टीचे मूल्यांकन करण्याची आता गरज नाही. येत्या नवीन वर्षात नलाईन पध्दतीने ‘ई- व्हेल्युएशन’प्रणालीद्वारे नागरिकांना घर बसल्या आपल्या मिळकतीचे बाजारमूल्य कळणार आहे. यामुळे दुय्यम निंबधक कार्यालयामध्ये नागरिकांना घालावे लागणारे हेलपाटे व चुकीच्या पध्दतीच्या मूल्यांकनाला आळा बसणार आहे.    राज्यात दररोज तब्बल ११ हजार पेक्षा अधिक विविध प्रकारच्या मिळकतीची नोंदणी होते. यामुळे किमान ५० ते ६० हजार पेक्षा अधिक लोकांना दररोज विविध कारणासाठी आपल्या मिळकतीचे मूल्यांकन करावे लागते. यासाठी संबंधित दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये जाऊन संबंधित अधिकारी अथवा कर्मचा-यांकडून मिळकतीचे मुल्यांकन करुन घ्यावे लागते. यामध्ये अनेक वेळा संबंधित अधिकारी, कर्मचारी त्यांच्या सोयीनुसार नियम,कायद्यांचे अर्थ लावून वेगवेगळ््या पध्दतीने व सोयीनुसार मुल्यांकन करुन देतात. यामध्ये सर्वसमान्य नागरिकांना यासाठी दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये हेलपाटे मारावे लागतात, तर अनेकवेळा अर्थिक व्यावहार देखील करावे लागतात. या सर्व प्रकारामध्ये सर्वसामान्य नागरिकांची मात्र पिळवणूक होते. यामुळेच नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक विभागाच्या वतीने मिळकतीचे बाजारमुल्य ठरविण्यासाठी नलाईन ‘ई- व्हेल्युएशन’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे.     दस्त नोंदणी कारण्यासाठी नोंदणी व मुद्रांक शुल्क विभागाच्या वतीने दरवर्षी मुद्रांक शुल्क आकारणीसाठी वार्षिक मुल्यदर तक्ते व सविस्तर मूल्यांकनासाठी मार्गदर्शक सूचना जाहिर केल्या जातात. मुल्यांकनासाठी सविस्तर मार्गदर्शक सूचना तांत्रिक स्वरुपांच्या असल्याने सर्वसामान्य नागरिकांना यासाठी दुय्यम निबंधक अथवा अन्य नोंदणी कार्यालयांकडे संपर्क करावा लागतो. नागरिकांना बाजारमुल्य करुन देण्यासाठी बहुतेक दुय्यम निबंधक कार्यालयांमध्ये एजन्टगिरी सुरु असून, हे एजन्ट देखील नागरिकांची पिळवणूक करतात.या सर्व प्रकारामध्ये पादर्शकता आणण्यासाठी नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक कार्यालयाच्या वतीने आयजीआर फीसच्या संकेतस्थळावर नलाईन सर्व्हिसेस या शिर्षाखाली ‘ई-मूल्यांकन’ लिंक दिली आहे. या लिंकवर जाऊन नागरिकांना आता घरी बसून आपल्या मिळकतीची सर्व माहिती या प्रणालीमध्ये भरल्यानंतर सध्याचे बाजार मुल्यांकन कळणार आहे.--------------------नोंदणी व मुद्रांक विभागाचा कारभार पारदर्शक करणे हाच उद्देशराज्यात शासनाच्या सर्व विभागांमध्ये नोंदणी व मुद्रांक विभाग नागरिकांना नलाईन सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नेहमीच आघाडीवर राहिले आहेत. नागरिकांना जास्तीत जास्त सुविधा उपलब्ध करुन देणे व नोंदणी व मुद्रांक शुल्कांमध्ये पादर्शकता आणणे यासाठीच येत्या नवीन वर्षांत ‘ई-मूल्यांकन’ प्रणाली विकसित करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे नागरिकांना घर बसल्या आपल्या मिळकतीचे बाजारमूल्य समजणार आहे. तसेच मिळकतीनुसार बाजलमुल्यांमध्ये एकसमानता येण्यासही मदत होणार आहे.- अनिल कवडे, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक

टॅग्स :Puneपुणेonlineऑनलाइन