शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

आपले प्रेरणादायी शब्द उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरतील, उद्धव ठाकरेंनी मानले नरेंद्र मोदींचे आभार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 27, 2020 14:38 IST

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत.

ठळक मुद्देनरेंद्र मोदींनी दिलेल्या या शुभेच्छांसाठी उद्धव ठाकरेंनी आभार व्यक्त केले आहे. 

मुंबई: राज्याचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा आज साठावा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने राजकीय नेत्यांपासून ते सर्वसामान्यांपर्यंत सर्वांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. यंदा कोरोनामुळे निर्माण झालेली परिस्थिती पाहता वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय उद्धव ठाकरेंनी घेतला आहे. त्यामुळे सोशल मीडियाच्या माध्यमातूनच उद्धव ठाकरेंना शुभेच्छा दिल्या जात आहे. 

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी उद्धव ठाकरेंना ट्विट करून शुभेच्छा दिल्या आहेत. "महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा. उद्धवजींच्या दीर्घ आणि निरोगी आयुष्यासाठी मी प्रार्थना करतो", असे ट्विट नरेंद्र मोदींनी केले आहे. तसेच, नरेंद्र मोदींनी दिलेल्या या शुभेच्छांसाठी उद्धव ठाकरेंनी आभार व्यक्त केले आहे. 

उद्धव ठाकरेंनी ट्विट करून आभार मानले आहेत. "माझ्या वाढदिवसानिमित्त आपण दिलेल्या शुभेच्छांसाठी मी आभारी आहे. आपले प्रेरणादायी शब्द मला व्यक्तिश: व राज्याच्या उज्वल भविष्यासाठी मार्गदर्शक ठरतील. पुढील काळात देशाच्या उन्नतीमध्ये महाराष्ट्राचे भरीव योगदान असावे यासाठी आपले मार्गदर्शन आम्हाला लाभत राहील याचा पूर्ण विश्वास वाटतो", असे ट्विट उद्धव ठाकरेंनी केले आहे.

याशिवाय, नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरेंना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देण्यासाठी पत्रही पाठवले आहे. त्यामध्ये "वाढदिवस हा गतकाळातल्या स्मृतींना उजाळा देण्याचा दिवस असतो, त्याबरोबरच हा दिवस म्हणजे एक संधी असते भविष्याची रूपरेषा निश्चित करण्याची. मला विश्वास आहे की आजचा दिवस राज्य आणि देश विकासाच्या संकल्पसिद्धीसाठी आपल्याला अधिक बळ देईल. आपल्याला वाढदिवसानिमित्त मी ईश्वराकडे हीच प्रार्थना करेन की त्याने आपल्याला आनंदी आणि आरोग्यपूर्ण दीर्घायुष्य द्यावे" असे नरेंद्र मोदींनी म्हटले आहे.

दरम्यान, यंदा कोरोनाच्या संकटात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी वाढदिवस साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच कार्यालय किंवा मातोश्री या निवासस्थानी भेटून शुभेच्छा देण्याचा आग्रह करु नका. वाढदिवसाला पुष्पगुच्छाऐवजी मुख्यमंत्री सहाय्यता निधीला मदत करा. या संकटात जनआरोग्य शिबिरे, रक्तदान, प्लाझ्मादान यांसारखे समाजोपयोगी उपक्रम राबवून रुग्णांना दिलासा द्या. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी कुठेही गर्दी करु नका आणि फलक लावू नका, असे आवाहन उद्धव ठाकरेंनी केले आहे.

आणखी बातम्या...

"हा दिवस म्हणजे, भविष्याची रूपरेषा निश्चित करण्याची संधी", वाढदिवसानिमित्त नरेंद्र मोदींचे उद्धव ठाकरेंना पत्र

'लालू-कवच' असताना सुशीलकुमार मोदींनी कोरोनाला घाबरू नये - राबडी देवी    

पब्जीसह २७५ चिनी अ‍ॅप्सवर बंदी? सरकार चीनला पुन्हा दणका देण्याच्या तयारीत    

'ये दोस्ती... हम नही तोडेंगे...', संजय राऊतांकडून उद्धव ठाकरेंना वाढदिवसाच्या शुभेच्छा!    

'हत्ती' vs. 'हात'; सरकारच्या विरोधात मतदान करा; बसपाच्या व्हिपने वाढवली काँग्रेसची डोकेदुखी    

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीUddhav Thackerayउद्धव ठाकरे