छेडछाडीला कंटाळून तरुणीने संपवलं स्वतःचं आयुष्य

By Admin | Updated: January 25, 2017 08:56 IST2017-01-25T08:56:17+5:302017-01-25T08:56:17+5:30

लातूर येथे छेडछाडीला कंटाळून एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

The young woman gets annoyed with a tickle, her own life | छेडछाडीला कंटाळून तरुणीने संपवलं स्वतःचं आयुष्य

छेडछाडीला कंटाळून तरुणीने संपवलं स्वतःचं आयुष्य

 ऑनलाइन लोकमत

लातूर, दि. 25 -  छेडछाडीला कंटाळून एका तरुणीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. लातूरमधील भोपनी गावातील ही घटना आहे. आत्महत्या केलेल्या तरुणीला गेल्या काही दिवसांपासून फोनवरुन शिवीगाळ करण्यात येत होती, आणि तिच्याच गावात राहणारा संदीप दोडके छेड काढून तिला त्रास देत होता. 
सततच्या  होणा-या या त्रासाला कंटाळून या तरुणी अखेर आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले आणि स्वतःचे आयुष्य संपवले. दरम्यान, या तरुणीची लग्नही ठरले होते. ही गोष्ट माहिती असतानाही संदीप दोडके तिची छेड काढायचा. तिचं लग्न ठरल्यानंतर तिला आणि तिच्या होणा-या नव-याला फोनवरुन शिवीगाळही करत होता. 
 
या सर्व त्रासाला कंटाळेलल्या तरुणीने गळफास घेत आत्महत्या केली. याप्रकरणी पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला असून आरोपी संदीप दोडके फरार झाला आहे. 
 

Web Title: The young woman gets annoyed with a tickle, her own life