शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तरुणाईच्या मोबाईल स्टेटसवर झळकतयं विठुरायाचं सावळं रुप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2019 13:17 IST

तरुणाईमध्ये क्रेझ; सोशल मीडियाच्या माध्यमातून पांडुरंगांची प्रसिद्धी

ठळक मुद्देसध्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीकडून विविध उपक्रम राबवले जात आहेतसध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात पंढरीचा पांडुरंग तरुणाईच्या हातून प्रसिध्दीसश्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपºयातून भाविक पंढरपुरात

पंढरपूर : महाराष्ट्राचे दैवत म्हणजे पंढरपूरचा पांडुरंग़ विठुरायाचे नाव जरी कुण्या भाविकाच्या मुखी आले, तरी त्याचे सावळे रुप आठवते़ श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे असो किंवा हिंदू सण, उत्सव त्या दिवशी मंदिरात विविध प्रकारची आकर्षक आरास केली जाते़ या आरासातील विठुरायाचे सावळे रूप अनेकांच्या मोबाईल स्टेटसवर पाहावयास मिळत आहे़ विशेषत: तरुणाईमध्ये याची क्रेझ वाढत आहे.

सध्या सोशल मीडियाच्या माध्यमातून जगभरात पंढरीचा पांडुरंग तरुणाईच्या हातून प्रसिध्दीस येत आहे. श्री विठ्ठलाच्या दर्शनासाठी देशाच्या कानाकोपºयातून भाविक पंढरपुरात येतात. आषाढी, कार्तिकी, चैत्री व माघ यात्रेसाठी लाखो भाविकांची मांदियाळी होते. पंढरीचा विठ्ठल म्हणलं की, विठ्ठलाबरोबर धोतर व नेहरु शर्ट घातलेला वारकºयाचा चेहरा समोर येतो़ वारकºयांची वेशभूषाही अशीच आहे.

सध्या श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीकडून विविध उपक्रम राबवले जात आहेत. यामध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या सर्व उत्सवाला, एकादशीला तुळशीची, विविध रंगीबेरंगी फुलांची आरास, विड्याच्या आणि रुईच्या पानांची आरास, २६ जानेवारी, १५ आॅगस्टनिमित्त तिरंगा रंगात मंदिराची सजावट, आंब्यांची आरास  व राष्टÑीय उत्सवादिवशी मंदिरात विविध पध्दतीची सजावट केली जात आहे.

मंदिर सजावटीचे फोटो समितीकडून व्हायरल करण्यात येत आहेत. ते फोटो तरुण आपल्या व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुक यासारख्या सोशल मीडियावर व्हायरल करत त्याच्या स्टेटसवर ठेवत आहेत. यामुळे धोतर घालणाºया वारकºयांपासून ते जिन्स घालणाºया तरुणांमध्येदेखील विठ्ठलाविषयी सर्वाधिक श्रध्दा निर्माण होत आहे. पंढरीचा विठ्ठलदेखील देशभरात, जगभरात प्रसिध्दीस येत आहे.श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समितीचे अध्यक्ष डॉ़ अतुल भोसले व सर्व सदस्य, कार्यकारी अधिकारी सचिन ढोले, व्यवस्थापक बालाजी पुदलवाड यांच्या संकल्पनेतून विविध विकासाभिमुख योजना साकारल्या जात आहेत.

विठ्ठल-रुक्मिणीमातेचा उत्सव, हिंदू सणादिवशी मंदिरात आकर्षक सजावट करण्यात येते. ते फोटो व्हॉट्सअ‍ॅप, फेसबुकवर व्हायरल होतात. त्यामुळे आबालवृद्ध वारकºयांमध्ये श्री विठ्ठल-रुक्मिणीमातेचे ते रुप याची एक वेगळी के्रझ निर्माण होत आहे. याचे अधिक समाधान मिळत आहे.- सचिन ढोलेकार्यकारी अधिकारी, श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरे समिती, पंढरपूर

टॅग्स :SolapurसोलापूरPandharpurपंढरपूरPandharpur Vitthal Rukmini Templeपंढरपूर विठ्ठल रूक्मिणी मंदीरSocial Mediaसोशल मीडिया