टीबीला हरवण्यासाठी तरुणांचा सहभाग महत्वाचा - राजकुमार बडोले
By Admin | Updated: July 9, 2016 17:58 IST2016-07-09T13:45:49+5:302016-07-09T17:58:21+5:30
देशासह राज्यात टीबीच्या रुग्णामध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आता टीबीला हरवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे.

टीबीला हरवण्यासाठी तरुणांचा सहभाग महत्वाचा - राजकुमार बडोले
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 09 - टीबी हरेल तर देश जिंकेल या घोषणेसह देशभरात टीबी हटवण्याची मोहिम सुरू असली तर देशासह राज्यात टीबीच्या रुग्णामध्ये वाढ होताना दिसत आहे. त्यामुळे आता टीबीला हरवण्यासाठी तरूणांसह सर्वांनी एकत्र येऊन काम करणे आवश्यक आहे असे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांनी सांगितले. मुंबईतील एका कार्यक्रमात ते बोलत होते.
त्यावेळी त्यांनी समाजात टीबी विषयी असलेले गैरसमज दूर करणे आवश्यक असल्याचे सांगत यासंबंधी जनजागृती करण्यासाठी सामजिक न्याय मंत्रालय काम करणार असल्याचे सांगितले. तसेच यामध्ये युवकांची मदत घेतली जाणार असल्याचेही त्यांनी नमूद केले.
यासाठी विद्यापिठाची मदत घेऊन जनजागृती केली जाणार असून एनएसएसची मुलेही या कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. त्याच बरोबर संशोधनावरही भर दिला जाणार आहे आणि लवकरच निदानसाठी जनजागृती केली जाणार असल्याचे ते म्हणाले.