फटाके फोडण्यास विरोध केला म्हणून तरूणाने घेतला वृद्धाचा जीव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2016 09:30 IST2016-11-02T09:29:13+5:302016-11-02T09:30:25+5:30
फटाके फोडण्यास विरोध केल्याने एका तरूणाने केलेल्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये घडली.

फटाके फोडण्यास विरोध केला म्हणून तरूणाने घेतला वृद्धाचा जीव
>ऑनलाइन लोकमत
सोलापूर, दि. २ - फटाके फोडण्यास विरोध केल्याने एका तरूणाने केलेल्या मारहाणीत वृद्धाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना सोलापूरमध्ये घडली. काशीनाथ शंकर यामजले असे त्या ८० वर्षीय मृत वृद्धाचे नाव आहे. याप्रकरणी पोलिसांनी राहुल जमादार या २० वर्षीय तरूणाला अटक केली आहे.
दिवाळीनिमित्त राहुल फटाके फोडत होता, मात्र काशीनाथ यांनी त्याला तसे करण्यापासून रोखले असता दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली. यामुळे चिडलेल्या राहुलने त्यांना मारहाण केली. या घटनेत जबर जखमी झालेल्या काशीनाथ यांचा मृत्यू झाला.