चिखलीत दुचाकी अपघातात तरुण ठार

By Admin | Updated: July 20, 2016 01:51 IST2016-07-20T01:51:14+5:302016-07-20T01:51:14+5:30

ओव्हरटेक करत असताना दुचाकीवरून घसरून पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला.

The young killed in a mike brawl | चिखलीत दुचाकी अपघातात तरुण ठार

चिखलीत दुचाकी अपघातात तरुण ठार


पिंपरी : ओव्हरटेक करत असताना दुचाकीवरून घसरून पडल्याने डोक्याला गंभीर दुखापत होऊन जागीच मृत्यू झाला. मंगळवारी सकाळी आठच्या सुमारास मोरे वस्ती, चिखली रस्त्यावर हा अपघात घडला. चक्रधर बाबासाहेब कोल्हे (वय २८, रा. सिंहगड कॉलनी, मोरे वस्ती, चिखली) असे मृत्यू झालेल्या कामगाराचे नाव आहे. बालाजी विलास बिरादार (वय ४३, रा. मोरेवस्ती, चिखली) या बसचालकास अटक करण्यात आली आहे. डोक्यात हेल्मेट होते. मात्र, ते व्यवस्थित घातले नसल्याने अपघात झाला. त्या वेळी हेल्मेट बाजुला पडल्याने निरुपयोगी ठरले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोल्हे हे चाकण येथील कंपनीत कामाला आहेत. मंगळवारी सकाळी ते दुचाकीवरून (वाहन क्रमांक एमएच २५ एक्स २८४२) घरी जात होते. (प्रतिनिधी)

Web Title: The young killed in a mike brawl

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.