डोंबिवलीजवळ चालत्या लोकलमधून पडल्याने तरूण मृत्यूमुखी
By Admin | Updated: November 28, 2015 11:20 IST2015-11-28T10:52:23+5:302015-11-28T11:20:56+5:30
गर्दीने खच्चून भरलेल्या लोकलमधून पडून एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना मध्य रेल्वेवरील दिवा-कोपर स्थानकांदरम्यान घडली आहे.

डोंबिवलीजवळ चालत्या लोकलमधून पडल्याने तरूण मृत्यूमुखी
ऑनलाइन लोकमत
डोंबिवली, दि. २८ - गर्दीने खच्चून भरलेल्या लोकलमुळे आणखी एका तरूणाचा मृत्यू झाल्याची घटना मध्य रेल्वेवरील डोंबिवलीजवळ घडली आहे. गर्दीमुळे लोकलच्या दरवाज्यात लटूकन प्रवास करणा-या तरूणाचा हात सुटल्याने तो चालत्या गाडीतून ट्रॅकवर पडला आणि त्यातच त्याचा अंत झाला आहे. भावेश नकाते असे मृत तरूणाचे नाव असून काल ( शुक्रवार) ही घटना घडली.
भावेशने काल सकाळी कर्जतहून सीएसटीला जाणारी गाडी डोंबिवली स्थानकातून पकडली खरी, पण प्रचंड गर्दीमुळे त्याला आत जाता न आल्याने त्याला दरवाज्यातच खांबाला पकडून उभे रहावे लागले. गाडी सुटल्यावर तो प्रवाशांना तो आत जाण्यास सांगत होता, मात्र गर्दीमुळे कोणालाच हलता येत नव्हतं. कोपर-दिवा स्थानकांदरम्यान गर्दीचा रेटा एवढा वाढला की भावेशचा खांबावरील हात निसटला आणि तो चालत्या गाडीतून खाली पडला व त्याचा मृत्यू झाला. दरम्यान या अपघाताबद्दल मध्य रेल्वेकडून कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही.
या अपघातामुळे रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षिततेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला आहे.