शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Young Global Leaders : यंग ग्‍लोबल लिडर्सच्या यादीत आदित्य ठाकरेंचं नाव, भारतातील केवळ 6 नेत्यांनाच मिळालं स्थान

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2023 10:51 IST

या वर्षाच्या यादीत जगभरातून केवळ 100 तरुणांची निवड करण्यात आली आहे.

शिवसेनेत उभी फूट पडल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचा एक, असे दोन गट निर्माण झाले. यानंतर, केंद्रीय निवडणूक आयोगानेही शिवसेना पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह मुख्यमंत्री एकनाथ शिंदें यांच्या पारड्यात टाकले. या संपूर्ण घटनेमुळे ठाकरे कुटुंबावर मोठ्या राजकीय संघर्षाची वेळ आली आहे. यातच आता ठाकरे कुटुंबासाठी एक आनंदाची बातमी आली आहे. शिवसेना (उद्धव ठाकरे) गटाचे नेते आदित्य ठाकरे यांचा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम 2023 च्या ग्लोबल यंग लीडर्सच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. 

वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमने (डब्ल्यूईएफ) या वर्षासाठी जगातील 40 वर्षापेक्षा कमी वय असलेल्या तरुण नेत्यांच्या यादीची घोषणा केली आहे. यात त्यांनी म्हटले आहे की, हे लोक संवादात सक्षम आर्टिफिशल इंटेलिजन्स ते आर्थिक समावेशापर्यंत विविध कामांमध्ये सामील आहेत. आणि अशा गटात येतात, ज्याचे सदस्य पुढे चालून नोबेल पारितोषिक विजेते, राष्ट्राचे प्रमुख, फॉर्च्युन 500 कंपन्यांचे सीईओ आणि ग्रॅमी पुरस्कार विजेते होऊ शकतात.

या वर्षाच्या यादीत जगभरातून केवळ 100 तरुणांची निवड करण्यात आली आहे. यात राजकीय, नाविन्यपूर्ण उपक्रम, मोठ्या परिवर्तनात्मक संशोधनाशी संबंधित, भविष्याचा विचार करणारे कार्यकर्ते आणि आपला समुदाय, देश आणि जगात सकारात्मक तथा दीर्घकालीन बदलांना गती देत आहेत, अशा तरुणांचा समावेश आहे. तरुण जागतीक नेत्यांची यादी 2004 पासून तयार केली जाते. यात 120 देशांतील 1,400 सदस्यांचा समावेश आहे.

या यादीत आदित्य ठाकरे यांच्या व्यतिरिक्त, भारतातील केवळ पाच लोकांचाच समावेश झाला आहे. यात भाजपच्या युवा मोर्चाचे उपाध्यक्ष मधुकेश्वर देसाई, टीवीएस मोटरचे व्यवस्थापकीय संचालक सुदर्शन वेणू, जिओ हॅप्टिक टेक्नॉलॉजीजचे सीईओ आकृत वैश, बायोजीनचे  सीईओ बी जोसेफ आणि पॉलिसी 4.0 रिसर्च फाउंडेशनच्या सीईओ तन्वी रत्ना यांचा समावेश आहे.

टॅग्स :Aditya Thackreyआदित्य ठाकरेShiv SenaशिवसेनाBJPभाजपा