वर्धा जिल्ह्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
By Admin | Updated: August 23, 2016 13:32 IST2016-08-23T13:32:03+5:302016-08-23T13:32:03+5:30
शेतकरी आत्महत्येचे सत्र अजुनही थांबलेले नसून समुद्रपूर तालुक्यातील हरणखुरी येथील तरुण शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातच कर्जाला कंटाळून आत्महत्या केली

वर्धा जिल्ह्यात तरुण शेतकऱ्याची आत्महत्या
>ऑनलाइन लोकमत
वर्धा, दि. २३ - शेतकरी आत्महत्येचे सत्र अजुनही थांबलेले नसून समुद्रपूर तालुक्यातील हरणखुरी येथील तरुण शेतकऱ्याने स्वतःच्या शेतातच कर्जाला कंटाळून आत्महत्या केली. वसंता गंगाराम उईके, वय 3५ या मृत शेतक-याचे नाव असून त्याच्याकडे १० एकर शेती असून बँकेचे कर्ज आहे. सततच्या नपाकीने तो त्रस्त होता. अशातच यावर्षी शेतातील उभे पीक जंगली श्वापदांनी फस्त केले . कर्जाचा वाढता डोंगर आणि हाती आलेले पीक गेल्यामूळे चिंतातूर असलेल्या वसंताने स्वतःच्या शेतात जाऊन विष प्राशन केले.बाजुच्या शेतातील शेतकऱ्यांनी त्याला ग्रामीण रुग्णालयात दाखल केले. प्रथमोउपचारानंतर सेवाग्राम येथील कस्तुरबा रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र उपचारादरम्याम त्याचा मृत्यू झाला. त्याच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, आईवडील असा बराच मोठा आप्तपरिवार आहे.