यंग बिग्रेडला संधी, जुन्यांवरही विश्वास
By Admin | Updated: September 25, 2014 01:42 IST2014-09-25T01:42:22+5:302014-09-25T01:42:22+5:30
अखिल भारतीय काँग्रेस समितीने बुधवारी मध्यरात्री ११८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. तीत नागपूर शहरातील सहाही व जिल्ह्यातील सावनेर व रामटेक, अशा एकूण आठ मतदारसंघातील

यंग बिग्रेडला संधी, जुन्यांवरही विश्वास
पडोळे यांचे तिकीट कटले- मुळक यांना धक्का
नागपूर : अखिल भारतीय काँग्रेस समितीने बुधवारी मध्यरात्री ११८ उमेदवारांची पहिली यादी जाहीर केली. तीत नागपूर शहरातील सहाही व जिल्ह्यातील सावनेर व रामटेक, अशा एकूण आठ मतदारसंघातील उमेदवारांचा समावेश आहे. नागपुरात नितीन राऊत, अनीस अहमदत, सतीश चतुर्र्वेदी तीन जुन्या जानत्या नेत्यांसह यंग ब्रिगेडमधील विकास ठाकरे, प्रफुल्ल गुडधे व अॅड. अभिजिंत वंजारी यांना उमेदवारी देऊन काँग्रेसने संतुलन साधण्याचा प्रयत्न केला आहे.
तिकीट वाटपात दक्षिण नागपूरचे आ. दीनानाथ पडोळे यांना झटका देण्यात आला. त्यांचे तिकीट कापून माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांचे पुनर्वसन करण्यात आले आहे. पश्चिम नागपूरच्या रस्सीखेचमध्ये शहर अध्यक्ष विकास ठाकरे यांनी बाजी मारली तर, माजी मंत्री अनिस अहमद हे पुन्हा एकदा गृह मतदारसंघ असलेल्या मध्य नागपुरात परतले आहेत. पालकमंत्री नितीन राऊत यांच्याकडे उत्तरचे पालकत्त्व कायम ठेवण्यात आले आहे.
असे आहेत उमेदवार
पूर्व नागपूर - अॅड. अभिजित वंजारी
पश्चिम नागपूर - विकास ठाकरे
उत्तर नागपूर - नितीन राऊत
दक्षिण नागपूर - सतीश चतुर्वेदी
मध्य नागपूर - अनिस अहमद
दक्षिण-पश्चिम - प्रफुल्ल गुडधे
सावनेर - सुनील केदार
रामटेक - सुबोध मोहिते