शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
3
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
4
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
5
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
6
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
7
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
8
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
9
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
10
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
11
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
12
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
13
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
14
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
15
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
16
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
17
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
18
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
19
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
20
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
Daily Top 2Weekly Top 5

एक दिवसाचा पगार तुम्हाला कमी मिळणार! मुख्यमंत्री निधीत जमा होणार! 

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 23, 2023 12:57 IST

राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला राज्य सरकारी अधिकारी, कर्मचारी धावून आले आहेत.

सर्वच सरकारी कार्यालयांमध्ये कार्यालयीन प्रमुखांकडून परिपत्रक फिरवून त्यावर कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्याही घेण्यात आल्या आहेत. राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीला राज्य सरकारी अधिकारी, कर्मचारी धावून आले आहेत. त्यांनी सरकारी आवाहनाला प्रतिसाद देत स्वत:च्या पगारातून एक दिवसाचा पगार मुख्यमंत्री सहायता निधीसाठी देण्याचे ठरविले आहे.

असे झाले नुकसान मार्च महिन्यात तीनवेळा पाऊस झाला. ४ ते  ९ मार्च दरम्यान गारपीट झाली. त्यामुळे १५ जिल्ह्यांत ३८ हजार ६०० हेक्टर पिकांचे नुकसान झाले. १५ ते २१ मार्च दरम्यान अवकाळी पाऊस झाला. त्याचा ३० जिल्ह्यांना फटका बसला. १ लाख ७ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान झाले. त्यानंतर झालेल्या पावसामुळे २८ हजार २८७ हेक्टर पिकांचे नुकसान झाल्याची शक्यता आहे. 

नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करणे हे प्रत्येकाचे  कर्तव्य आहे. सरकारी कर्मचारीही त्यात मागे नाहीत. मात्र, नुकसान एका विशिष्ट भागात झाले आहे. त्यामुळे मदत करणे हे कर्मचाऱ्याला ऐच्छिक असल्यामुळे संघटनेचा त्यांना कोणताही विरोध नाही.- विश्वास काटकर, सरचिटणीस, राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना 

कर्मचाऱ्यांच्या पगारावर अनेक गोष्टी अवलंबून असतात. ज्यांना काही आर्थिक चणचण नाही त्यांना मदत करताना काही अडचण येणार नाही. अडचण असेल तर ते पत्र देतील. ऐच्छिक असल्याने आमचा त्याला काहीही विरोध नाही. - प्रवीण बने, चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटना  

अवकाळी पाऊस आणि गारपिटीने भर शिवारात उभ्या शेतीचे नुकसान झाले. सरकारने घोषणा केली तरी हातात एक पैसा नाही. आता पावसाळ्यात करायचे काय? आमच्या मदतीसाठी कोण धावणार? - धोंडीराम फुलझरे, नुकसानग्रस्त शेतकरी

टॅग्स :Employeeकर्मचारीFarmerशेतकरी