शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
4
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
5
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
6
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
7
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
8
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
9
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
10
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
11
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
12
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
13
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
14
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
15
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
16
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
17
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
18
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
19
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
20
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
Daily Top 2Weekly Top 5

"...माझ्या पाठीशी तू खंबीरपणे उभी राहिलीस," एकनाथ शिंदेंच्या पत्नीला अनोख्या पद्धतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 11, 2022 14:32 IST

एकनाथ शिंदे यांनी आपल्या पत्नी लता शिंदे यांना अनोख्या पद्धतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात राजकीय नाट्य रंगलं होतं. शिवसेनेच्या ३९ आमदारांनी बंडखोरी करत एकनाथ शिंदे यांची साथ दिली होती. त्यानंतर एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आणि देवेंद्र फडणवीस हे उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले. राज्यात एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सरकार स्थापन झालं. दरम्यान, एकनाथ शिंदे यांनी आपल्या पत्नी लता शिंदे यांना अनोख्या पद्धतीनं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. 

"जीवनातील बिकट व प्रतिकूल परिस्थितीत माझ्या पाठीशी तू खंबीरपणे उभी राहिलीस, सामाजिक, राजकीय जीवनात मी समर्पित होऊन कार्यरत असताना आपल्या संसाराचा गाडा जबाबदारीने व अतिशय मायेने हाकलास. तुझ्यासारखी सुजाण, सुज्ञ, मनमिळाऊ पत्नी लाभणे हे माझे बलवत्तर नशीब समजतो. लता, वाढदिवसाच्या शुभेच्छा," असं ट्विट एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. तसंच त्यांनी आपल्या लता शिंदे यांच्यासोबत एक फोटोही शेअर केला आहे.

साजरा केला होता आनंदमुख्यमंत्रिपदी विराजमान झालेले एकनाथ शिंदे ठाण्यात परतल्यानंतर लता शिंदे यांचा आनंद गगनात मावेनासा झाला होता. त्यांनी त्यावेळी चक्क ड्रम वाजवत आपला आनंद साजरा केला होता. त्याचा व्हिडीओही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला होता.वाचा - कडक! एकनाथ शिंदेंच्या स्वागतासाठी मिसेस मुख्यमंत्र्यांनी वाजवला ड्रम, Video तुफान व्हायरल

टॅग्स :Eknath Shindeएकनाथ शिंदेMaharashtraमहाराष्ट्र