शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
4
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
5
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
6
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
7
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
8
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
9
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
10
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
11
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
12
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
13
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
14
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
15
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
16
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
17
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
18
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
19
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
20
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
Daily Top 2Weekly Top 5

सकाळी 11 पर्यंत आपले मतदान झाले पाहिजे; संघ आणि परिवारातील संघटना सक्रिय

By यदू जोशी | Updated: March 26, 2024 06:55 IST

जिल्हा बैठकांना रा. स्व. संघाचे त्या-त्या ठिकाणचे जिल्हा संघचालक उपस्थित होते.

मुंबई : ‘आपले’ मतदार सकाळी ११ पर्यंत मतदान पूर्ण करतील या दृष्टीने प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशी यंत्रणा सक्रिय करा, असे आदेश राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघ परिवारातील ३६ संघटनांच्या बैठकांमधून देण्यात आले आहेत.  सूत्रांनी सांगितले, मार्चच्या दुसऱ्या आठवड्यात एकाच दिवशी प्रत्येक जिल्ह्याच्या बैठका झाल्या. नंतर तालुकास्तरीय बैठका झाल्या.

जिल्हा बैठकांना रा. स्व. संघाचे त्या-त्या ठिकाणचे जिल्हा संघचालक उपस्थित होते. परिवारातील संघटनांचे प्रमुख पदाधिकारी आणि भाजपचे निवडक नेतेही बैठकांना हजर होते. आपला परंपरागत मतदार प्रत्येक बुथवर असतो. त्याचे शंभर टक्के मतदान झाले पाहिजे आणि शक्यतो सकाळी ११ पर्यंत ते आटोपले पाहिजे, अशा सूचना या बैठकांमध्ये देण्यात आल्या.

प्रत्यक्ष मतदानाच्या दिवशीही परिवारातील सर्व संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते परस्पर समन्वय राखणार आहेत. केंद्रात पुन्हा एकदा राष्ट्रीय विचारांचे सरकार सत्तेत आणण्यासाठी झोकून देऊन काम करण्याचे निर्देश या बैठकांमध्ये देण्यात आले. आपल्याला कोणाचेही व्यक्तिमाहात्म्य सांगायचे नाही. 

- मोदी सरकारने दहा वर्षांत अनेक राष्ट्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांना हात घातला. पुढेही असेच काही विषय मार्गी लावायचे तर आपल्या विचारांचे सरकार येणे आवश्यक आहे, असे बैठकीत स्पष्टपणे सांगण्यात आले. 

गावागावातील मंदिरांमध्ये बैठका राष्ट्रहित समोर ठेवून गेल्या दहा वर्षांत अनेक निर्णय नरेंद्र मोदी सरकारने घेतले असल्याचे निदर्शनास आणून देत राष्ट्रीय मुद्द्यांचा अजेंडा राबवायचा असेल तर पुन्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संधी द्या, असा संदेश देणाऱ्या हजारो बैठका संघ आणि परिवारातील ३६ संघटनांचे पदाधिकारी आगामी १५ ते २० दिवसांत राज्यभर घेणार आहेत.  त्यांचे वैशिष्ट्य म्हणजे शक्यतो गावागावातील मंदिरांमध्ये या बैठका होतील. प्रत्येक बैठकीला दहा ते बारा जणांनाच आमंत्रित केले जाईल. विविध क्षेत्रात प्रभाव असणाऱ्या व्यक्तींचा आमंत्रितांमध्ये प्रामुख्याने समावेश असेल.  संघाच्या रचनेत एका जिल्ह्यात ६० ते ७० मंडळ असतात. एकेका मंडळात किमान ६०० ते ७०० बैठका होतील.

टॅग्स :maharashtra lok sabha election 2024महाराष्ट्र लोकसभा निवडणूक निकाल २०२४lok sabha election 2024लोकसभा निवडणूक २०२४Votingमतदान