जायकवाडीत पाणी सोडावेच लागेल!
By Admin | Updated: December 11, 2014 01:28 IST2014-12-11T01:28:08+5:302014-12-11T01:28:08+5:30
मुळा धरणातून मराठवाडय़ाच्या जायकवाडी धरणात पाणी सोडावेच लागेल, न्यायालयाचे तसे स्पष्ट आदेश आहेत.

जायकवाडीत पाणी सोडावेच लागेल!
नागपूर : मुळा धरणातून मराठवाडय़ाच्या जायकवाडी धरणात पाणी सोडावेच लागेल, न्यायालयाचे तसे स्पष्ट आदेश आहेत. अशी स्पष्ट भूमिका जलसंपदामंत्री गिरीष महाजन यांनी अहमदनगरहून आलेल्या शिष्ठमंडळापुढे घेतली आहे. दरम्यान बुधवारी सकाळर्पयत अर्धा टीएमसी पाणी जायकवाडीत आल्याची माहिती अधिका:यांनी आढावा बैठकीत दिली आहे.
जायकवाडीतून पाणी सोडण्याचा निर्णय न्यायालयाचा आहे. असे सांगून महाजन म्हणाले, जे नियमानुसार पाणी द्यायचे आहे ते दिले जाईल. त्यात कोणताही राजकीय दबाव ऐकून घेतला जाणार नाही. न्यायालयाचे आदेश सरकारला मान्यच आहेत. त्यामुळे त्या विरोधात जाऊन आम्ही काही करणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले. अधिका:यांनी यावेळी जे सादरीकरण केले त्यात महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणच्या निकालातील काही निर्णय यावेळी मंत्रीमहोदयांना दाखवण्यात आले.