शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

'तुम्ही नरेंद्र मोदींना विष्णूचा अवतार म्हणता, तर आम्ही...' छगन भुजबळ यांचे भाजपला प्रत्युत्तर

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2023 15:13 IST

'आम्हाला शरद पवार गोरगरीबांचा जाणता राजा वाटतात.'

नाशिक: सध्या राज्यात महापुरुषांच्या नावावरुन राजकारण सुरू आहे. राष्ट्रवादीचे नेते अजित पवार आणि जितेंद्र आव्हाड यांनी केलेल्या वक्तव्यामुळे भाजपने आक्रमक पवित्रा घेतला आहे. यातच, शरद पवारांना 'जाणता राजा' म्हणण्यावरुन छगन भुजबळही भाजप नेत्यांच्या निशण्यावर आले आहेत. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी भुजबळांवर जोरदार टीका केली होती. त्यानंतर आता भुजबळ यांनी बावनकुळे यांना प्रत्युत्तर दिलं आहे. 

...म्हणून जाणता राजा म्हणालोआज छगन भुजबळ यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, 'चंद्रशेखर बावनकुळे भाजपचे राज्याचे अध्यक्ष आहेत, त्यांनी अशाप्रकारची हस्यास्पद विधाने करू नये. शरद पवारांना जाणता राजा का म्हणालो, याचं स्पष्टीकरण मी आधीच दिलं आहे. पवारांनी शेतकऱ्यांचे 80 हजार कोटी रुपये कर्ज माफ केले, उद्योगधंदे आणले, देशाच्या अन् राज्याच्या विकासात योगदान दिलंय. म्हणूनच त्यांना जाणता राजा म्हणालो. याचा अर्थ मी त्यांची छत्रपती शिवाजी महाराजांशी तुलना करतो असं नाही,' असं भुजबळ म्हणाले.

मोदी विष्णूचे अवतारते पुढे म्हणाले की, 'बसवेश्वरा महात्मा होते, त्यांना आपण आजही महात्मा म्हणतो. त्यानंतर महात्मा म्हणून आपण महात्मा फुलेंचा उल्लेख करतो. गांधीजींनाही महात्मा म्हणून संबोधतो. चांगली कामे करणाऱ्याला विशेषण दिलं तर अडचण काय आहे? तुम्ही नरेंद्र मोदींना विष्णूचा आवतार म्हणता, आम्ही काय म्हणालो? तुम्हाला ते विष्णूचे आवतार वाटतात तुम्ही म्हणा, आम्हाला पवार साहेब गोरगरीबांचा जाणता राजा वाटतात. कशाला वाद वाढवायचा...' असंही भुजबळ म्हणाले.

टॅग्स :Chhagan Bhujbalछगन भुजबळSharad Pawarशरद पवारChandrashekhar Bawankuleचंद्रशेखर बावनकुळे