तुम्ही पाकिटमार, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

By Admin | Updated: February 5, 2017 21:58 IST2017-02-05T21:58:02+5:302017-02-05T21:58:02+5:30

तुम्ही पाकिटमार आहात, नोटाबंदी करुन तुम्ही गरिबांच्या कष्टाचा पैसा खिशात हात घालून काढला, अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपावर हल्लाबोल

You attack Paktmar, Uddhav Thackeray on BJP | तुम्ही पाकिटमार, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

तुम्ही पाकिटमार, उद्धव ठाकरेंचा भाजपावर हल्लाबोल

>ऑनलाइन लोकमत
मुंबई,दि. 5 - तुम्ही पाकिटमार आहात, नोटाबंदी करुन तुम्ही गरिबांच्या कष्टाचा पैसा खिशात हात घालून काढला, अशा शब्दात  शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी भाजपावर हल्लाबोल केला. भांडुपमधील आयोजित प्रचारसभेत त्यांनी भाजपाचा खरपूस समाचार घेतला. 
ज्या पक्षाचे माजी अध्यक्ष बंगारू लक्ष्मण लाच घेताना पकडले जातात त्यांना पारदर्शकतेच्या बाता करताना लाज वाटत नाही अशा शब्दात उद्धव यांनी भाजपावर टीकेचा भडीमार केला. 
उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे-
आमच्यावर पारदर्शक नसल्याचा आरोप करतात,  आरोप करा, मात्र आधी स्वत:कडे बघा . नोटाबंदी हे भाजपनं लादलेलं संकट आहे. अनेकजण रांगेत उभे राहिले, अनेकांचे जीव गेले. नोटाबंदीमुळे दहशतवादी हल्ले थांबले नाहीत की काळा पैसा थांबला नाही. अच्छे दिन केव्हा येणार हा प्रश्न आता पडत नाही तर माझा एटीएममध्ये नंबर केव्हा येईल हा प्रश्न पडतो. 
संयुक्त महाराष्ट्र अखंड ठेवू, तोडू देणार नाही . हिंमत असेल तर अखंड महाराष्ट्राची शपथ घ्या.  शिवसैनिकांचं मुंबईशी रक्ताचं नातं आहे, मुंबईकर असल्याचं आम्हाला सांगावं लागत नाही, अशा शब्दात उद्धऴ यांनी भाजपावर टीका केली. 
   
 

Web Title: You attack Paktmar, Uddhav Thackeray on BJP