तुम्ही तर देवाचीच मुले
By Admin | Updated: July 30, 2014 01:24 IST2014-07-30T01:24:39+5:302014-07-30T01:24:39+5:30
भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी आजवर लाखो विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. परंतु मंगळवारी त्यांनी ज्यावेळी जीवोदय एज्युकेशन सोसायटीच्या विशेष मुलांच्या शाळेला भेट दिली,

तुम्ही तर देवाचीच मुले
...अन् कलामचाचा म्हणाले,
नागपूर : भारताचे माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांनी आजवर लाखो विद्यार्थ्यांशी संवाद साधला आहे. परंतु मंगळवारी त्यांनी ज्यावेळी जीवोदय एज्युकेशन सोसायटीच्या विशेष मुलांच्या शाळेला भेट दिली, तेव्हा येथील मुलांशी नेमके काय बोलावे या संभ्रमात ते पडले. यातूनही त्यांनी मार्ग काढला व विद्यार्थ्यांशी कलामचाचा बनून संवाद साधला. एका विद्यार्थ्याने सहज प्रश्न केला, आमच्याबद्दल तुम्हाला काय वाटते अन् कलामचाचा अगदी मनातून बोलून गेले, तुम्ही तर देवाचीच मुले आहात.
सदर येथील या शाळेत डॉ.कलाम यांनी ३०० हून अधिक विशेष विद्यार्थी व त्यांच्या पालकांची भेट घेतली.
विशेष मुलांकडे दुर्लक्ष न करता पालक व शिक्षकांनी त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी कठोर मेहनत घ्यावी. आपुलकीमुळे तर कान नसलेल्याला समोरच्याच्या भावना कळतात आणि दृष्टिहीनालादेखील मार्ग सापडतो असे ते म्हणाले. अमेरिकेतील एका मातेने स्वत:च्या विशेष मुलाला मेहनत करून शिकविले आणि तो त्यामुळे ठीक झाला, असे उदाहरण त्यांनी दिले.
या भेटीदरम्यान डॉ.कलाम यांनी संगणक प्रशिक्षण केंद्राची पाहणी केली व विद्यार्थ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप दिली. (प्रतिनिधी)