योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांनी RPI मध्ये यावे - आठवले
By Admin | Updated: March 29, 2015 19:36 IST2015-03-29T19:32:27+5:302015-03-29T19:36:46+5:30
आम आदमी पक्षाचे संस्थापक सदस्य प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांची आपमधून हकालपट्टी झालेली असतानाच आपमधील नाराज नेत्यांना गळाला लावण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी कंबर कसली आहे.

योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांनी RPI मध्ये यावे - आठवले
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २९ - आम आदमी पक्षाचे संस्थापक सदस्य प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांची आपमधून हकालपट्टी झालेली असतानाच आपमधील नाराज नेत्यांना गळाला लावण्यासाठी रिपब्लिकन पक्षाचे नेते रामदास आठवले यांनी कंबर कसली आहे. योगेंद्र यादव व प्रशांत भूषण यांनी आरपीआयमध्ये यावे असे सांगत आठवलेंनी दोन्ही नेत्यांनी साद घातली आहे.
प्रशांत भूषण व योगेंद्र यादव यांना पक्षाविरोधी कारवाया केल्याचा आरोपावरुन आम आदमी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. आपमधील अंतर्गत संघर्ष चांगलाच रंगात आला असताना या वादात रिपब्लिकन पक्षाचे (आठवले गट) प्रमुख खासदार रामदास आठवले यांनी उडी मारली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानावरच आरपीआयची स्थापना झाली आहे. आम आदमी पक्ष व आरपीआयची विचारधारा समान असल्याने या दोन्ही नेत्यांनी आरपीआयमध्ये यावे असे आवाहन आठवले यांनी केले आहे. आठवले यांच्या आवाहनाला योगेंद्र यादव व प्रशांत भूषण कितपत प्रतिसाददेतील हादेखील मोठा प्रश्नच आहे.