योगाचार्य बी.के.एस अय्यंगार यांचे निधन
By Admin | Updated: August 20, 2014 08:51 IST2014-08-20T07:56:41+5:302014-08-20T08:51:06+5:30
योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार यांचे बुधवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. पुण्यातील प्रयाग रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

योगाचार्य बी.के.एस अय्यंगार यांचे निधन
ऑनलाइन लोकमत
पुणे, दि. २० - योगाचार्य बी.के.एस. अय्यंगार यांचे बुधवारी पहाटे दीर्घ आजाराने निधन झाले. पुण्यातील प्रयाग रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ९६ वर्षांचे होते. किडनी निकामी झाल्याने अय्यंगार यांना डायलिसिसवर ठेवण्यात आले होते. मंगळवारी त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. अखेर बुधवारी पहाटे त्यांचे रुग्णालयात निधन झाले. अय्यंगार योगाचे जन्मदाते असणा-या अय्यंगार यांना 'पद्मविभूषण' पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते.
बी. के. एस. अय्यंगार यांचा जन्म १९१८ साली कर्नाटकमधील कोलार जिल्ह्यातल्या बेल्लूर झाला. त्यांचे वडील श्री. कृष्णम्माचार शाळेत शिक्षक होते तर त्यांची आई शेषम्मा या गृहिणी, दोघांच्याही संस्कारांच्या छायेत त्यांचे बालपण गेले. मात्र लहनपणी ते बरेच आजारी असायचेय मलेरिया. टीबी, टायफइड या आजारांमुळे त्यांची प्रकृती अतिशय नाजूक होती. ते पाच वर्षांचे असताना अय्यंगार यांचे कुटुंब बंगळुरू येथे स्थायिक झाले. त्यानंतर अवघ्या चार वर्षांत त्यांच्या वडिलांचे निधन झाले