शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

मजबूत राष्ट्र बनवण्यासाठी योगाची आवश्यकता - राज्यपाल चे.विद्यासागर राव

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 13, 2017 13:57 IST

एक मजबूत राष्ट्र निर्माण करण्यासाठी योगाची अत्यंत आवश्यकता आहे़. योगगुरु बाबा रामदेव यांनी डिजिटल युगात योगाचे महत्व पटवून देऊन आधुनिक आणि अध्यात्मिक अशा दोन विचारांना एकत्र आणले आहे, असे उद्गार राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी काढले. ‘इम्पॅक्ट पर्सन ऑफ द इयर पुरस्कार 2017’ हा योग गुरु बाबा रामदेव यांना राज्यपाल यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.

मुंबई :  एक मजबूत राष्ट्र निर्माण करण्यासाठी योगाची अत्यंत आवश्यकता आहे़. योगगुरु बाबा रामदेव यांनी डिजिटल युगात योगाचे महत्व पटवून देऊन आधुनिक आणि अध्यात्मिक अशा दोन विचारांना एकत्र आणले आहे, असे उद्गार राज्यपाल चे.विद्यासागर राव यांनी काढले. ‘इम्पॅक्ट पर्सन ऑफ द इयर पुरस्कार 2017’ हा योग गुरु बाबा रामदेव यांना राज्यपाल यांच्या हस्ते देण्यात आला. त्यावेळी ते बोलत होते.आयटीसी ग्रँण्ट हॉटेल येथे एक्सचेंज मिडिया ग्रुप कलर्सतर्फे मीडिया आणि जाहिरात उद्योगांसाठी दिल्या जाणाऱ्या ‘इम्पॅक्ट पर्सन ऑफ द इयर 2017’ च्या पुरस्कारांचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी राज्यसभा सदस्य विनय सहस्त्रबुद्धे, सीओओ व्हायाकॉमचे राजनायक, एक्सचेंज फोर मीडिया ग्रुपचे अध्यक्ष अननाराग बत्रा, बिझनेस वर्ल्डचे अध्यक्ष नवल अहुजा आदी उपस्थित होते.राज्यपाल म्हणाले, चार शतकाआधी समर्थ रामदास स्वामी यांनी एक मजबूत राष्ट्र निर्माण करण्यासाठी निरोगी व्यक्तींची आवश्यकता आहे असे सांगितले होते. पूर्वीच्या काळातही योगाला महत्व दिले जात होतेच मात्र योग शिक्षण देणारे योग गुरु आणि योग संस्था अत्यंत मर्यादित होत्या. योग गुरु रामदेव बाबांनी योग हा सार्वत्रिक पोहचवला आहे, त्यांचे हे कार्य कौतुकास्पद आहे. जाहिरात क्षेत्राला उद्देशून ते म्हणाले की, जाहिरात ही अत्यंत महत्वाची कला आहे. ग्रामविकास विभागामार्फत स्वयंसहायत्ता बचत गटांची दरवर्षी प्रर्दशन लावली जातात मात्र त्यांची जाहिरात न केल्यामुळे चांगल्या दर्जाची उत्पादने राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत पोहचू शकत नाहीत. जाहिरात क्षेत्राने ग्रामीण बचत गट, लघु उद्योग सर्वदूर पोहोचण्यासाठी मदत करावी, असेही आवाहन त्यांनी यावेळी केले.तसेच यावेळी ‘इम्पॅक्ट द ग्रेट डिस्ट्रीब्युटर’ या माहिती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले. मानांकित पुरस्कार भावेश अग्रवाल, सुरेश नारायण, प्रसुन जोशी, संजीव महेत, आनंद कृपालू, अमिताभ कांत, आशिष भैसने यांना देण्यात आले.

टॅग्स :Yogaयोग