योगा, जॉगिंग ठेवते फिट
By Admin | Updated: October 11, 2014 06:16 IST2014-10-11T06:16:03+5:302014-10-11T06:16:03+5:30
राजकीय व्यक्तींचे जीवन तसे धावपळीचे़ आणि निवडणुकीच्या काळात ही धावपळ कैकपटीने वाढत असते़ कडक उन्हातून घरोघरी प्रचार,

योगा, जॉगिंग ठेवते फिट
शेफाली परब-पंडित, मुंबई
राजकीय व्यक्तींचे जीवन तसे धावपळीचे़ आणि निवडणुकीच्या काळात ही धावपळ कैकपटीने वाढत असते़ कडक उन्हातून घरोघरी प्रचार, बैठका, पदयात्रा आणि सभा. यंदाच्या विधानसभा निवडणुकीतही उमेदवारांची अशीच धावपळ सुरू आहे़ दिंडोशी मतदारसंघातील काँग्रेस आणि पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार राजहंस सिंह यांची ‘लोकमत’ने टिपलेली ही धावपऴ़़
राजहंस सिंह यांचा दिनक्रम सकाळी ६ वाजता सुरू होतो़ घरोघरी जाऊन प्रचार करण्यावरच त्यांनी भर दिला आहे़ पण उन्हातान्हातून फिरण्यासाठी फिट राहणे आवश्यक असल्याने सकाळी उठल्यानंतर ते नियमित योगा आणि जॉगिंग करतात़ नऊपासून त्यांच्या प्रचारफेरीला सुरुवात होते़ आपल्या मतदारसंघातील एका विभागापासून त्यांची पदयात्रा सुरू होते़ नागरिकांना प्रत्यक्ष भेटून त्यांच्या समस्या जाणून घेतात़ त्या समस्यांची नोंद घेण्यासाठी त्यांनी सचिवालाही बरोबर घेतलेले असते़ निवडून आल्यानंतर या नोंदवहीतील समस्यांवर प्राधान्याने तोडगा काढण्यात येईल, असे राजहंस सिंह सांगतात़
रणरणत्या उन्हात घामाच्या धारा वाहत असतात़ तरीही पहिल्या टप्प्यातील ही प्रचारफेरी पूर्ण करूनच ते साडेबाराच्या सुमारास आपल्या कार्यालयात परतात़ कार्यकर्त्यांची फौज तेथे हजर असतेच़मध्येच एखादी झोप घेतल्यानंतर दुसऱ्या टप्प्यातील प्रचारासाठी ते सज्ज होतात़ प्रचाराला कमी दिवस उरल्यामुळे अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न उमेदवार करीत आहेत़ अशा वेळी आरोग्य सांभाळणे महत्त्वाचे़ म्हणून राजहंस सिंह यांनी पौष्टिक आहार घेतात. घरी तयार केलेले अन्न हे सर्वात बेस्ट़ दोन चपात्या, डाळ, भात, भाजी हा साधा आहारच त्यांना फिट ठेवत आहे़ जाहीर सभा संपेपर्यंत रात्र सरत असते़ तरीही आरोग्याची हेळसांड न करता योग्य आहार ते घेतात़