येवल्यात कांद्याची विक्रमी आवक, भावात घसरण सुरूच
By Admin | Updated: January 16, 2017 18:30 IST2017-01-16T18:30:02+5:302017-01-16T18:30:02+5:30
येवला व अंदरसूल मार्केट यार्डवर सोमवारी 1250 ट्रॅक्टर आणि 380 पिकअप मधून 36 हजार 700 क्विंटल एवढी आवक

येवल्यात कांद्याची विक्रमी आवक, भावात घसरण सुरूच
>ऑनलाइन लोकमत
येवला (नाशिक),दि. 16 - येवला आणि अंदरसूल मार्केट यार्डवर सोमवारी 1250 ट्रॅक्टर आणि 380 पिकअप मधून 36 हजार 700 क्विंटल एवढी आवक झाली. येवला कांदा बाजार आवाराचा सर्व परिसरात कांदाच कांदा चोहीकडे असे चित्र दिसत होते. मार्केटचा परिसर पूर्ण भरल्याने नगर-मनमाड रस्त्यावर दोन्ही बाजूना ट्रॅक्टरच्या रांगाच रांगा लागल्या होत्या.
सुमारे दोन तास या रस्त्यावरून धीम्या गतीने वाहतूक चालू होती. येवला कांदा बाजार आवारात भाव किमान 351 ते 579 पर्यंत होते. आणि सरासरी भाव 530 रुपये प्रतीक्विंटल होते.उपबाजार अंदरसूल येथे लाल कांद्याचे भाव किमान 275 रुपये ते कमाल 557 रुपये आणि सरासरी 470 रुपये होते अशी माहिती बाजार समितीचे सचिव डी.सी. खैरनार यांनी दिली.कांद्याचे बाजार भाव पुन्हा 100 ते 150 रुपयांनी घसरल्याने शेतकऱ्याची चिंता वाढली आहे.