होय, आम्ही सारे दाभोलकर
By Admin | Updated: August 24, 2014 00:00 IST2014-08-24T00:00:40+5:302014-08-24T00:00:40+5:30
अंधश्रद्धा निमरूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध करत त्यांच्या रचनात्मक कार्याचा प्रसार करण्याचा निर्धार पुण्यातील तरुणाईने केला.

होय, आम्ही सारे दाभोलकर
पुणो : अंधश्रद्धा निमरूलनाच्या लढाईत प्राणाची आहुती देणा:या अंधश्रद्धा निमरूलन समितीचे कार्याध्यक्ष डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या हत्येचा निषेध करत त्यांच्या रचनात्मक कार्याचा प्रसार करण्याचा निर्धार पुण्यातील तरुणाईने केला.
‘लोकमत युवा नेक्स्ट’ आणि ‘लोकमत बालविकास मंच’च्या वतीने हा उपक्रम झाला. विविध शाळा आणि महाविद्यालयांतील विद्याथ्र्यानी डॉ. दाभोलकर यांच्या पहिल्या स्मृतीदिनी कॅँडलमोर्चा काढत त्यांच्या विचारांचा प्रकाश पसरविण्याचा निर्धार केला.
भारतीय विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालय, के. जे. सोमय्या अभियांत्रिकी महाविद्यालय, सी. के. गोयल कनिष्ठ महाविद्यालय, व्ही. आय.टी स्कूल अॅंड ज्युनिअर कॉलेज आणि विद्यांचल स्कूचे विद्यार्थी यामध्ये सहभागी झाले होते. भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य आनंद भालेराव विद्याथ्र्याना मार्गदर्शन करताना म्हणाले, ‘‘ डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या रचनात्मक कार्याचा प्रसार करणो हिच त्यांना स्मृतिदिनी खरी श्रध्दांजली ठरणार आहे.‘‘
व्ही. आय.टी. स्कूलचे प्राचार्य पी.एस. नेमाडे म्हणाले, ‘‘ कृतिशिल तरुणाई ही मोठी ताकद आहे. परिवर्तनाचा विचार पुडे नेऊन समाजात बदल घडविण्याचे काम करावे.’’
के. जे. सोमय्या अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य संजीव वाघ म्हणाले, ‘‘ अंधश्रध्दा, बुवाबाजी यासारख्या अनिष्ठ रुढींच्या विरोधात डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आयुष्यभर लढा दिला.
आज त्यांच्या स्मृतिदिनी त्यांचे कार्य पुढे चालविण्याचा वसा विद्याथ्र्यानी घेण्याची गरज आहे.’’ कॅँडलमार्चमध्ये सहभागी झालेल्या विद्याथ्र्यानी आपल्या भावना
व्यक्त केल्या. ‘लोकमत युवा
नेक्स्ट’ आणि ‘लोकमत बालविकास मंच’च्या सभासदांनी या उपक्रमात सहभाग घेतला. (प्रतिनिधी)
डॉ. दाभोलकर यांच्या हत्येचा शोध न लागणो ही खेदाची गोष्ट आहे. माध्यमे हे लोकांर्पयत पोहोचण्याचे महत्त्वाचे साधन असून डॉ. दाभोलकरांचा विचार सर्वार्पयत जावा, यासाठी त्यांनी प्रयत्न करावेत.
- विजय मानकर सी. के. गोयल महाविद्यालयाचे उपप्राचार्य
आजची तरुणाई केवळ बोलकी नाही, तर कृतिशिल आहे, हे दाखविण्याची गरज आहे. कॅँडल मार्च हे केवळ प्रतीक आहे, परंतु, डॉ. दाभोलकर यांचे विचार आत्मसात करणो, हिच त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल.
- युवराज भंडारी, के.जे. अभियांत्रिकीचा विद्यार्थी
‘लोकमत युवा नेक्स्ट’च्या माध्यमातून राबविण्यात आलेल्या या उपक्रमातून आजची तरुणाई सामाजिक विषयांवरही किती सजग आहे, हे दिसत आहे. पुरोगामी विचारांची सुरूवात विद्यार्थी जीवनापासून होणो महत्त्वाचे आहे.
- सुनिता फाळके, विद्यांचल स्कूलच्या प्राचार्य
डॉक्टर आपल्यात आज नसले, तरी त्यांचे कार्य कायम स्मरणात राहणारे आहे.
- सतिश खामकर, डॉ. डी.वाय.पाटील महाविद्यालयाचा विद्यार्थी