शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

“होय, आमची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर”; देवेंद्र फडणवीसांचा मोठा खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2023 06:03 IST

विरोधकांना काय बोलायचे ते बोलू द्या. आम्ही पारदर्शी व प्रामाणिकपणे काम करू, अशी ग्वाही देवेंद्र फडणवीसांनी दिली.

लोकमत न्यूज नेटवर्क, शिर्डी/ कोपरगाव (जि. अहमदनगर) : दोन्ही उपमुख्यमंत्र्यांची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे, असा आरोप विरोधकांकडून केला जातोय, होय, आमची नजर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर आहे. कारण, ती खुर्ची सुरक्षित राहावी, त्या खुर्चीकडे कोणी वाकड्या नजरेने पाहू नये, यासाठी आहे, असा खुलासा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला.

वाकडी (ता. कोपरगाव) येथे आयोजित शासन आपल्या दारी कार्यक्रमात फडणवीस यांनी विरोधकांचा समाचार घेतला. ‘फेस टू फेस पोहोचणारे हे सरकार आहे, फेसबुकवर बोलणारे हे सरकार नाही’, असे म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता टीका केली. ‘मी पुन्हा येईन’ असे म्हणालो होतो, बोलल्याप्रमाणे तसेच झालेही होते, परंतु काही लोकांनी गद्दारी केली. तरीही मी परत आलोच. आता विरोधकांना काय बोलायचे ते बोलू द्या. आम्ही पारदर्शी व प्रामाणिकपणे काम करू, अशी ग्वाही फडणवीस यांनी दिली.

सरकारचा बालदेखील बाका होणार नाही 

विरोधक रोज सकाळी माध्यमांसमोर येऊन ‘सरकार पडेल, सरकार पडेल’ म्हणायचे. त्यांचे ज्योतिषीदेखील खोटे ठरले आहेत. आता तर अजित पवार आमच्या सोबत आले आहेत. त्यामुळे ‘सरकारचा बालदेखील बाका होणार नाही’, कावळ्याच्या शापाने गाय मरत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर अविश्वास ठराव आणून केंद्रातील विरोधकांनी आपले हसे करून घेतले आहे.  - एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री. राजकीय खिचडी : अजित पवार

देश पातळीवर नरेंद्र मोदी यांच्यासारखा दुसरा नेता दिसत नाही. त्यांचे नेतृत्व संपूर्ण जगाने मान्य केलेले आहे. अशा नेत्याला बाजूला सारण्यासाठी सर्वजण एकत्र येत आहेत. त्यांच्या या राजकीय खिचडीतून काहीच साध्य होणार नाही, असे अजित पवार म्हणाले.

 

टॅग्स :Devendra Fadnavisदेवेंद्र फडणवीसEknath Shindeएकनाथ शिंदेAjit Pawarअजित पवार