शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

हो..., मी सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आले, पण...; सुप्रिया सुळे स्पष्टच बोलल्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 18, 2024 20:29 IST

"या सोन्याच्या बांगड्या आणि माझ्या तोंडातला सोन्याचा चमचा हा कुठल्या इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडीचा नाही." असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. 

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज थांबला. यानंतर आता बारामती मतदारसंघावर संपूर्ण राज्याचे लक्ष आहे. कारण येथे एकाच पवार कुटुंबातील दोन सदस्य समोरासमोर उभे आहेत. आज येथे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची सभा पार पडली. यावेळी, "एका पत्रात माझ्यावर टीका झाली की, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्यांना पंधराशे रुपयाची काय किंमत? अरे हो, सोन्याचा चमचा घेऊन आले जन्माला मी. आजीने दिलेल्या सोन्याच्या बांगड्यातून मला ताकद येते. या सोन्याच्या बांगड्या आणि माझ्या तोंडातला सोन्याचा चमचा हा कुठल्या इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडीचा नाही." असे सुप्रिया सुळे यांनी म्हटले आहे. 

हो, सोन्याचा चमचा घेऊन आले जन्माला मी -सुले म्हणाल्या, "एका पत्रात माझ्यावर टीका झाली की, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आल्यांना पंधराशे रुपयाची काय किंमत? अरे हो, सोन्याचा चमचा घेऊन आले जन्माला मी. हो, सुप्रिया सुळे, सोन्याचा चमचा घेऊन जन्माला आली. पण एक गोष्ट तुम्हाला सांगते की, या सोन्याच्या बांगड्या घालते ना, या सहा सोन्याच्या बांगड्या आहेत. या सोन्याच्या बांगड्या शारदाबाई पवारांच्या आहेत. माझी आजी जोपर्यंत जिवंत होत्या, त्यांच्या हातात या सोन्याच्या बांगड्या होत्या. त्या गेल्यानंतर या सहा बांगड्या माझ्या आईला दिल्या. त्या सहा बांगड्या माझी आई सोन्याचं काही घालत नाही म्हणून तिने कपाटात ठेवल्या. माझ्या लग्नात मला दिल्या. तो दिवस आणि आजचा दिवस. माझी ताकद कुठून येते? तर शारदाबाई पवारांच्या या सहा सोन्याच्या बांगड्यातून येते. या सोन्याच्या बांगड्या आणि माझ्या तोंडातला सोन्याचा चमचा हा कुठल्या इन्कम टॅक्स, सीबीआय आणि ईडीचा नाहीत. तो गोविंदराव पवार आणि शारदाबाई पवारांच्या कष्टाच्या, रक्ताच्या पैशातून घातलेल्या या सहा सोन्याच्या बांगड्या आहेत." असे सुप्रिया सुळे म्हणाल्या

"ज्या माळाच्या देवीवर माझी आजी नेहमी जायची, तो दिवस आणि ती कथा माझी आई आणि माझ्या काकी मला सांगायच्या. रजनी इंदुलकर तुम्हाला माहिती असतील ऐकून. ज्यांच्यावर मध्यंतरी रेड झाली होती. त्या रजनी इंदुलकर त्यांची आई ज्यांना मी मोठी आई म्हणायची. मोठ्या काकींनी मला एक गोष्ट सांगितली होती. त्या मोठ्या काकींनी मला असं सांगितलं होतं की पवार साहेब एकदा मुंबईला गेले होते, तेव्हा तिथे दंगल झाली, दगडफेक झाली आणि त्या दगडफेकीमध्ये साहेबांच्या गाडीला काहीतरी दगड लागला. साहेब गाडी चालवत होते. मोबाईल नसल्याने दोन दिवस कुणालाच काहीच माहिती मिळाली नाही. माझ्या आजीच्या मानत होतं की, शरद सुरक्षित परत आला, तर मी माळाच्या देवीला जाईन आणि ओटी भरेन. तो दिवस आणि आजचा दिवस, आम्ही जेव्हा जेव्हा बारामतीला येतो, तेव्हा आई आणि मी माळाच्या देवीला जातो," अशी आठवणीही सुळे यांनी यावेळी सांगितली. 

टॅग्स :maharashtra assembly election 2024महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४Supriya Suleसुप्रिया सुळेNCPराष्ट्रवादी काँग्रेस