शहरं
Join us  
Trending Stories
1
मर्सिडीज-हुरुनचा अहवाल आला! भारतात करोडपतींच्या संख्येत ९० टक्क्यांनी वाढ..., महाराष्ट्र टॉपर, प्रचंडच...
2
मारुती अल्टोपेक्षा ही कार स्वस्त झाली; जीएसटीने कमालच केली, मारुतीचे जगच इकडचे तिकडे केले...
3
'हैदराबाद गॅझेटिअरच्या नावाखाली सरकारने फसवणूक केली'; मराठा गोलमेज परिषदेत आरोप
4
अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे विमान न्यू यॉर्कमध्ये अपघातातून थोडक्यात बचावले...
5
“तुम्ही बोलत नाही, आम्ही ओबीसी आरक्षणासाठी लढायचे नाही का?”; छगन भुजबळांचा शरद पवारांना सवाल
6
मतचोरीचा राहुल गांधींचा आरोप, एकनाथ शिंदेंचे खुले आव्हान; म्हणाले, “ठोस पुरावे द्या अन्...”
7
शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढा ! सातबारा कोरा करण्यासाठी कर्जमुक्ती करा
8
Nanded: शांतता बैठकीतच मराठा-ओबीसी वादाला हिंसक वळण, रिसनगावात ४ जखमी
9
हैदराबाद गॅझेटवर हायकोर्टाचा मोठा निर्णय; याचिकाकर्त्यांना सुनावले, आता मराठा आरक्षणाचे काय?
10
डोनाल्ड ट्रम्प यांची माघार! लवकरच भारतावरील शुल्क हटवणार; कुणी केला दावा? पाहा...
11
“GST सुधारणा हा राहुल गांधींच्या दूरदृष्टीचा विजय, २२ तारखेला राज्यभर पेढे वाटणार”: काँग्रेस
12
Sairat: 'सैराट' सिनेमात रिंकू राजगुरुच्या आईवडिलांचीही दिसलेली झलक, कोणता आहे तो सीन?
13
'खोटारडं' पाकिस्तान पुन्हा उघडं पडलं... मॅच रेफरीच्या केबिनमध्ये काय घडलं? सत्य समोर आलं...
14
Kangana Ranaut : "माझ्याच हॉटेलचा काल ५० रुपयांचा धंदा", पूरग्रस्तांसमोर कंगना राणौतने मांडली स्वत:चाची व्यथा
15
अभिमानास्पद! वडील हवाई दलात अधिकारी, लेक झाली लेफ्टनंट; इंजिनिअरिंगनंतर देशसेवेचं स्वप्न
16
ठाकरे बंधू एकत्र आले तर मविआवर काय परिणाम होईल? शरद पवार थेट म्हणाले, “मग आता वेगळे...”
17
Video: उंटाने पहिल्यांदाच चाखली लिंबाची चव अन् 'अशी' झाली अवस्था, पाहून तुम्हालाही येईल हसू
18
Javelin Throw Final : भारताचा गोल्डन बॉय नीरज अन् पाक ऑलिम्पिक चॅम्पियन नदीमवर भारी पडला सचिन; पण...
19
यंदा रावण नाही, सोनम रघुवंशीचा पुतळा जाळणार! इंदूरच्या नागरिकांचा वेगळाच दसरा प्लॅन; राजाच्या कुटुंबालाही आमंत्रण
20
राहुल गांधींच्या हायड्रोजन बॉम्बपूर्वी चंद्रपूरच्या 'राजुरा' मतदारसंघात खळबळ ! निवडणूक आयोगावर मत वगळण्याचे गंभीर आरोप

येळकोट येळकोट जय मल्हार! खंडोबाच्या दर्शनासाठी जेजुरी गडावर भाविकांची गर्दी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2020 20:49 IST

मंदिर उघडल्याने कुलधर्म कुलाचारासाठी खंडोबा गडावर भाविकांची गर्दी होऊ लागली आहे.  

ठळक मुद्देकुलधर्म कुळाचारासाठी भाविकांची भली मोठी रांग : नवविवाहीत दांपत्याची गर्दी

जेजुरी : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आदेश दिल्याप्रमाणे जेजुरीचे खंडोबा मंदिर पाडव्याला उघडण्यात आले. त्यावेळेपासून भाविकांनी जेजुरीत खंडोबा दर्शनासाठी गर्दी केली आहे. एकावेळी मंदिरामध्ये फक्त शंभर लोकांना सोडले जात आहे. गेल्या सोमवारी पहाटे पुरंदरचे आमदार संजय जगताप व   राजवर्धिनी जगताप यांच्या हस्ते पूजा करून भाविकांना दर्शनासाठी सोडण्यास सुरुवात झाली.  जेजुरीकर आणि काही संघटना व संस्थांकडून भाविकांचे स्वागत करण्यात आले. तर खंडोबा मंदिर उघडल्याने जेजुरीतील ग्रामस्थ व भाविकांनी भंडार उधळून आनंद साजरा केला. तब्बल आठ महिन्यांनी जेजुरीतील लॉज, हॉटेल्स, उपाहारगृहे उघडली असून भाविकांची वर्दळ सुरू झाल्याने जेजुरीची अर्थव्यवस्था पूर्वपदावर येऊ लागली आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी गडावर पूर्ण सुरक्षितता घेतली जात आहे. गडावरील पूजा अभिषेक बंद आहेत. 

मंदिर उघडल्याने कुलधर्म कुलाचारासाठी खंडोबा गडावर भाविकांची गर्दी होऊ लागली आहे.  प्रामुख्याने नवविवाहीत दांपत्याची गर्दी पहावयास मिळत आहे.  लॉक डाऊनमध्ये लग्न झालेले अनेक जोडपी देव दर्शनाला येऊ लागली आहेत. राज्यभरातील भाविक ही माहिती घेऊन देव दर्शनाला येऊ लागले आहेत. काल रविवार असल्याने एकाच दिवसात वीस ते पंचवीस हजार भाविकांनी जेजुरीत गर्दी केली होती. यामुळे सोशल डिस्टसिंग पाळणे अडचणीचे होऊ लागले आहे. शासकीय नियमांचे पालन करणे भाविकांची जबाबदारी आहे मात्र भाविक मात्र हे पाळत नसल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत मार्तंड देव संस्थान कडून नियोजन करावे लागणार आहे.......................अनेक भाविक लहान मुले किंवा वयोवृद्ध ही दर्शनाला येत आहेत. मंदिर उघडल्यापासून दररोज किमान दीड ते दोन हजार भाविक येत आहेत. एका वेळी  १०० भाविकांना देव दर्शनासाठी गडकोटात सोडले  आणि योग्य डिस्टन्स पाळले तर दिवसभरात दीड ते दोन हजार भाविकांना दर्शन मिळू शकते. मात्र, गर्दीवर नियंत्रण आणणे अडचणीचे ठरत आहे. रविवार देवाचा वार असल्याने भाविकांची जेजुरीत मोठी गर्दी होती. दर्शनासाठी नियोजन करणे हाताबाहेर जाणारे आहे. पुढील रविवारी तर सलग तीन दिवस सुट्ट्या असल्याने मोठी गर्दी राहण्याची शक्यता आहे. याबाबत देव संस्थान कडून नियोजन करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.  यासाठी विश्वस्त मंडळाची त्वरित  बैठक बोलावली असून नियोजन करावेच लागणार असल्याचे प्रमुख विश्वस्त प्रसाद शिंदे यांनी म्हटले आहे.

टॅग्स :JejuriजेजुरीKhandoba Yatraखंडोबा यात्राcorona virusकोरोना वायरस बातम्याTempleमंदिर